November 21, 2024

Samrajya Ladha

महाशिवरात्रीनिमित्त बाणेरच्या श्री क्षेत्र बाणेश्वर मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन…

बाणेर :

बाणेर येथील श्री क्षेत्र बाणेश्वर देवस्थानच्या वतीने पांडव कालीन गुफा मंदिर येथे महाशिवरात्री निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.गुरुवारी (ता.७) सायंकाळी पाच वाजता १००८ शंखनिनाद व साडे सहा ते आठ वाजता होम हवन करण्यात येणार आहे.

महाशिवरात्रीच्या दिवशी शुक्रवार (ता.८) रोजी रात्री बारा ते पहाटे चार वाजता शिवाभिषेक सकाळी साडेसात वाजता महारुद्राभिषेक(आर्ट ऑफ लिव्हिंग) होणार आहे. तर दुपारी बारा ते तीन या वेळेत बाणेर महिला मंडळाचे भजन होणार आहे.साडेपाच ते सात या वेळेत श्रीमती चरण्या गुरूसत्या नाट्यशाळा अकॅडमीचे भरतनाट्यम सादरीकरण होणार आहे. रात्री आठ वाजता महाआरती, दहा ते बारा गुरु माऊली भजनी मंडळ यांचे भजन व रात्री बारा ते सव्वा एक पर्यंत महाशिवरात्री निशिथकाल पूजा होईल. तसेच संपूर्ण दिवस दर्शन व महाप्रसाद होणार असून भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री बाणेश्वर सेवा ट्रस्ट व समस्त बाणेरकरांच्या वतीने करण्यात आले आहे.

भाविकांसाठी पश्चिमद्वार दर्शनासाठी खुले करण्यात आले असून पश्चिमेला पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. फ्री पार्किंग आणि दर्शन रांग साठी देवस्थान ट्रस्ट वतीने नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून स्कॅन कोड ची सुविधा उपलब्ध केली आहे.