November 21, 2024

Samrajya Ladha

बाणेर गावात महिला बचत गटांनी महिला दिनानिमित्त राबविले विविध कार्यक्रम..

बाणेर :

बाणेर येथील भैरवनाथ मंदिर मध्ये अहिल्या आणि सावित्री बचत गटांच्या वतीने महिला दिनानिमित्त हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन केले होते. तसेच यावेळी महिलांसाठी लकी ड्रॉ काढण्यात आला व वेगवेगळे खेळ घेऊन महिलांना भेट वस्तू देण्यात आल्या.

या वेळी महिलांसाठी लकी ड्रॉ काढण्यात आला. कार्यक्रमात अहिल्या सावित्री बचत गटाकडून साड्या, तर राज मसाले परिवार तर्फे आकर्षक मसाले आणि गिफ्ट, पुरुषोत्तम लोणकर न्यूज पेपर एजन्सी यांच्याकडून कै. प्रकाश नारायण लोणकर यांच्या स्मरणार्थ भेटवस्तू देण्यात आल्या.

यावेळी वेगवेगळे खेळ खेळण्यात आले तसेच लकी ड्रॉ नंबर घेण्यात आले या कार्यक्रमाला सहाशेहून महिलांनी सहभाग घेतला होता. त्यामुळे महिलांचा प्रचंड प्रतिसादामुळे कार्यक्रम छानच रंगला होता. यामध्ये विजेता महिलांना पारितोषिक सरला ताई चांदेरे, ज्योतीताई बालवडकर, पूनम ताई विधाते, रोहिणी ताई चिमटे माजी नगरसेविका पाषाण, सिमा हेमंत शिंदे अस्तित्व फाउंडेशन आध्यक्षा, पल्लवी ताई पायगुडे -कस्तुरी क्लब विभाग प्रमुख, रेश्मा ताई केदारी- पवित्रा फाऊंडेशन, मुरकुटे ताई, यांचे हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी मान्यवरांनी मनोगत व्यक्त करत अहिल्या बचत गट आणि सावित्री बचत गटाची मेहनत आणि महिलांनी दिलेला प्रतिसाद याबद्दल भरभरून कौतुक केले.

साजना दिलीप भुजबळ (अध्यक्ष अहिल्या महिला बचत तसेच पुणे शहर ग्राहक रक्षक समितीच्या प्रवक्ता ) आणि हेमाली पूरुषोत्तम लोणकर (अध्यक्ष सावित्री महिला बचत गट) यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.