बाणेर :
भारतातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे युरोलोजी चे सेंटर यूरोकुल कुलकर्णी यूरो सर्जरी इन्स्टिट्यूट प्रायव्हेट लिमिटेड बाणेर येथे गेल्या एक वर्षापासून कार्यरत आहे. डॉ. संजय कुलर्णी प्रसिद्ध यूरो सर्जन व जागतिक प्रथम लापरोस्कॉपिक सर्जन डॉ ज्योत्स्ना कुळकर्णी हे या इन्स्टिट्यूट चे संचालक आहेत. सर्व प्रकारच्या यू रोलॉजी च्याअत्याधुनिक शस्त्रक्रिया येथे केल्या जातात. जानेवारी महिन्यात यूरोकुल येथे पहिली रक्ताच्या नात्यातील किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. यासाठी कार्यरत असणाऱ्या सगळ्या टीम चां कौतुक सोहळा म्हणून दि 15 फेब्रू रोजी एका विशेष सोहळ्याचे यूरोकुल कुळकर्णी यूरोसूर्जरी इन्स्टिट्यूट बाणेर येथे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री प्रतापराव पवार अध्यक्ष सकाळ मीडिया समूह उपस्थित होते.
नेफरोलॉजी विभागातील डॉ सुहास मोंढे व डॉ श्रुती चंदन खेडे तसेच यूरोलोजी विभागांतील डॉ. संजय कुलकर्णी, लाप्रोस्कोपी सर्जन डॉ. ज्योत्स्ना कुलकर्णी, डॉ. पंकज जोशी, डॉ. आदर्श कुरी, डॉ. अमित होसमनी डॉ. उदय चंदनखेडे, डॉ. अमेय यांच्या मार्गदर्शन खाली शस्त्रक्रिया पार पडली. दोन्ही रुग्णांना उत्तम स्थितीत घरी पाठवण्यात आले. या रुग्णाच्या हॉस्पिटल मध्ये इतर नियोजनासाठी सुविधांसाठी डॉ. प्रमोद भावे, या रुग्णांच्या कौन्सिलिंग इतर मदतीसाठी साठी ट्रान्सप्लांट कोओरडीनेटर डॉ. मंजुश्री परदेशी, तसेच रुग्णाच्या तपासण्यासाठी डॉ. साकेत पटवर्धन व ए जी लॅब या सर्वांची मोलाची मदत झाली. वडिलांनीच आपल्या मुलाला किडणी दान केल्यामुळे या शस्त्रक्रियेने एक आदर्श निर्माण केला आहे.
या प्रसंगी शस्त्रक्रियेत सहभागी झालेले यूरोलोगिस्ट डॉ. पंकज जोशी, डॉ आदर्श कूरी, डॉ. अमित होसमानी, डॉ. उदय चंदनखेडे, तसेच किडनी विषयी तज्ञ डॉ सुहास मोंढे, डॉ. श्रुती चंदनखेडे, भुल तज्ञ डॉ. सुधीर फडके, नर्सिंग विभागातर्फे सौम्या कुळकर्णी या सर्वांचा मां श्री प्रतापराव पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
संचालक डॉ संजय कुळकर्णी व डॉ ज्योत्स्ना कुळकर्णी
यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. सुहास मोंढे यांनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया विषयी माहिती सांगितली. किडनी दाता व शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांनी आपले मनोगत व्यक्त केले व शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर व व्यवस्थापन विषयी गौरवोद्गार काढले.
प्रतापराव पवार यांनी सर्व डॉ टीम चे कौतुक केले तसेच उरोकुल मध्ये होत असलेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून केलेल्या जाणाऱ्या शस्त्रक्रिया विषयी डॉ संजय कुलकर्णी, डॉ जोस्ना कुलकर्णी यांचे अभिनंदन केले व शुभेछा दिल्या.
डॉ पंकज जोशी यांनी सूत्र संचालन केले. किडनी आजाराविषयी डायलिसिस विषयी व प्रत्यारोपण विषयी मार्गदर्शन यू रोकुल – कुळकर्णी यूरोसूर्जरी इन्स्टिट्यूट बाणेर येथे उपलब्ध आहे. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ राजेश देशपांडे यांनी केले.
More Stories
बालेवाडी येथे स्त्री फाउंडेशनकडून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांची सन्मान..
बालेवाडी येथे अमोल बालवडकर फाउंडेशन तर्फे हॅप्पी स्ट्रीट-2024 चे आयोजन…
श्री क्षेत्र बाणेश्वर देवस्थान बाणेर येथे महाशिवरात्र आणि वर्धापन दिन उत्साहात साजरा…