म्हाळुंगे :
आज म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री.शिवछत्रपती क्रिडा संकुल याठिकाणी क्रिडा व युवा संचालनालय महाराष्ट्र राज्य व अमोल बालवडकर फाऊंडेशन यांच्या वतीने भव्य शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पारंपारीक ढोल-ताशा पथक, पोवाडा गायन, मर्दानी खेळ व शिवकालिन शस्त्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी बालेवाडी येथील शिवभक्तांनी किल्ले सिंहगड ते बालेवाडी अशा आयोजित मशाल यात्रेचे स्वागत केले.
तसेच छत्रपती शिवाजी महारांच्या पुतळ्यास पुष्प हार अर्पण करुन महाराजांना त्रिवार वंदन केले. यावेळी सर्व शिवभक्तांच्या उपस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची आरती व शिववंदना संपन्न झाली.





























More Stories
बालेवाडी येथे स्त्री फाउंडेशनकडून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांची सन्मान..
बालेवाडी येथे अमोल बालवडकर फाउंडेशन तर्फे हॅप्पी स्ट्रीट-2024 चे आयोजन…
श्री क्षेत्र बाणेश्वर देवस्थान बाणेर येथे महाशिवरात्र आणि वर्धापन दिन उत्साहात साजरा…