September 22, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल मध्ये अमोल बालवडकर फाऊंडेशनतर्फे होणार भव्य शिवजन्मोत्सव सोहळा…

बालेवाडी :

रयतेच्या स्वराज्याचे संस्थापक, हिंदवी साम्राज्याचे प्रवर्तक, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने क्रीडा व युवा संचनालय, महाराष्ट्र राज्य व अमोल बालवडकर फाऊंडेशनतर्फे १९ फेब्रुवारी रोजी श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे-बालेवाडी येथे भव्य शिवजन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

या शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या अनुषंगाने शिव व्याख्यान, शस्त्रास्त्र प्रदर्शन, मर्दानी खेळ, ढोल-ताशा पथक, पोवाडा आदी कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले असून सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या भव्य कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही विनंती माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी सर्व शिवप्रेमींना केली आहे.

 

 

You may have missed