September 18, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बाणेर येथे तरुणावर गोळी घालून आरोपीची स्वतःवर गोळी मारत आत्महत्या..

बाणेर :

बाणेर येथे आकाश जाधव या व्यक्तीवर अनिल ढमाले या व्यक्तीने गोळीबार करून औंध जवळ जाऊन स्वतः वर गोळी झाडत आत्महत्या केली. त्यामध्ये आकाश हा गंभीर जखमी झाला असून त्यास ज्युपिटर हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

सदर प्रकार आर्थिक देवाण-घेवाणीमधून झाल्याची प्राथमिक माहिती असून सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास बाणेर येथे घडला आहे.

घटनेची माहिती मिळताच चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस अधिकारी तसेच गुन्हे शाखेच्या पोलिस अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. पोलिस अधिकचा तपास करत आहे.

 

You may have missed