June 19, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बालेवाडी येथील चेतन बालवडकर यांचा टाटा मोटर्स एम्प्लॉईज युनियनच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सन्मान..

बालेवाडी :

बालेवाडी येथील चेतन अंकुश बालवडकर यांची टाटा मोटर्स एम्प्लॉईज युनियनच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मोरेश्वर बालवडकर मित्र परिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला.

 

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनंतर सर्वात प्रतिष्ठेची समजली जाणाऱ्या टाटा मोटर्स एम्प्लॉईज युनियनच्या निवडणुकीत बालेवाडी गावातील सुपुत्र चेतन अंकुश बालवडकर हे प्रचंड बहुमताने नुकतेच निवडून आले होते. त्यांची आता उपाध्यक्ष म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. म्हणून त्यांचा यथोचित सन्मान मोरेश्वर बालवडकर यांच्या मित्रपरिवार वतीने सन्मान करण्यात आला.

यावेळी भाजपा कोथरूड उत्तर विधानसभा उपाध्यक्ष/जॉइंट सेक्रेटरी बालेवाडी वेल्फेअर मोरेश्वर बालवडकर, ए. पी. आय. गोरक्षनाथ बालवडकर, योगेश बालवडकर, विक्रम बालवडकर, राकेश बालवडकर, जीवन बालवडकर हे उपस्थीत होते.