November 21, 2024

Samrajya Ladha

बालेवाडी वेल्फेअर फेडरेशन तर्फे “दि बालेवाडी ट्रिब्युन” प्रकाशन सोहळा संपन्न..

बालेवाडी :

बालेवाडी वेल्फेअर फेडरेशन तर्फे “दि बालेवाडी ट्रिब्युन” च्या अंकाचे प्रकाशन सामाजिक कार्यकर्ते आणि प्रसिद्ध रेडिओ जॉकी संग्राम खोपडे यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. बालेवाडी वेल्फेअर फेडरेशनच्या विविध उपक्रमांची नागरिकांना माहिती व्हावी व त्यांना फेडरेशनच्या कार्यात सहभागी करून घ्यावे या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

संग्राम खोपडे यांनी फेडरेशनच्या कामाचे कौतुक करतांना सांगितले की नागरिकांनी आपल्या मागण्या ठामपणे मांडाव्यात आणि त्या पुर्ण होईपर्यंत पाठपुरावा करावा. अल्पसंतुष्ट राहू नये. पुणे शहर रहाण्यासाठी उत्तम शहर व्हायला हवे आणि त्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा.

फेडरेशनचे अध्यक्ष रमेश रोकडे यांनी सर्वांच्या सहकार्याने बालेवाडीचे प्रश्न सोडविण्याची फेडरेशनची भुमिका स्पष्ट केली. अमेय जगताप यांनी प्रास्ताविक करून फेडरेशनच्या सामाजिक कामात मदत करण्याच्या हेतूने अनेकांनी “दि बालेवाडी ट्रिब्युन” साठी जाहिराती दिल्या त्यांचे आभार मानले.

योगेंद्र सिंह यांनी या अंकाबद्दल माहिती दिली. उपाध्यक्ष अशोक नवाल यांनी सांगितले की सामाजिक बांधिलकी या नात्याने फेडरेशन काम करते आणि त्यात तडजोड नाही. सचिन पाटील यांनी आभार मानले.

ॲड. माशाळकर, ॲड. परशुराम तारे, मोरेश्वर बालवडकर, आशिष कोटमकर, यश चौधरी, ॲड. इंद्रजित कुळकर्णी, डी.डी.सिंग, शुभांगी चपाटे, अस्मिता करंदीकर, डॉ. निखारे, वैभव आढाव आणि शकिल सलाती या फेडरेशनच्या कार्यकर्त्यांनी हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला बालेवाडीतील सर्व क्षेत्रातील मान्यवर आणि पत्रकार उपस्थित होते.