October 9, 2024

Samrajya Ladha

चैतन्य विद्या प्रतिष्ठान च्या पेरिविंकल इंग्लीश मिडियम स्कूलचे पिरंगुट शाखेचे स्नेहसम्मेलन उत्साहात संपन्न…

बाणेर :

चैतन्य विद्या प्रतिष्ठान च्या पेरिविंकल इंग्लीश मिडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज च्या पिरंगुट शाखेचे स्नेहसम्मेलन बाणेर येथील बंटारा भवन येथे अत्यंत उत्साहात व जल्लोशात संपन्न झाले.“कलाविष्कार – The cultural carnival” या आधारावर शाळेचे मुख्याध्यापक अभिजित टकले यांच्या अध्यक्षतेखाली स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. अयोध्येच्या पार्श्वभूमीवर रामायणाचे सुंदर असे सादरीकरण करण्यात आले.

शेतकरी नृत्य, कृष्णलीला, महाराज सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास उपस्थित असणारे प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध किर्तनकार पंकज महाराज गावडे स्वत: जातीने उपस्थित होते. इतर अनेक मान्यवरांमध्ये माया पंकज गावडे, शिवाजीराव बुचडे पुणे जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष व उद्योजक,पिरंगुटच्या माजी सरपंच ललिताताई पवळे, नगरसेवक योगेश मोकाटे, नगरसेविका श्रद्धा प्रभुणे, शिवसेनाप्रमुख ( मुळशी तालुका ) दीपक आबा करंजावणे, माजी उपसरपंच पौड मोनाली ताई ढोरे, उद्योजक प्रशांत नाहर, भरत बालवडकर, पत्रकार संघाचे उपाध्यक्ष बंडू दातीर, पेरीविंकल इंग्लिश मीडियम स्कूल चे संस्थापक अध्यक्ष श्री राजेंद्र बांदल सर डायरेक्टर रेखा मॅडम, युवा डायरेक्टर यश बांदल, संदीप ढमढेरे, प्रदीप साठे, दिनेश कंधारे आदी मान्यवर उपस्थित होते.

पेरीविंकल पिरंगुट शाखेचे मुख्याध्यापक डॉ. अभिजीत टकले सर यांच्या मार्गदर्शनाखाली माध्यमिक विभागाच्या पर्यवेक्षिका पूनम पांढरे प्राथमिक विभागाच्या पर्यवेक्षिका सना इनामदार पर्यवेक्षिका पल्लवी नारखेडे यांच्याबरोबर सर्व शिक्षक वृंदांनी या कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन केले होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चुणचुणीत बालगोपालांनी केले यामध्ये श्रवण पवळे, त्रिशा भामे, प्रणित गायकवाड या सूत्र संचालकांच्या मनोवेधक भाषाशैलीने उपस्थितांची मने जिंकून घेतली. प्रज्ञा हंद्राळे, संचिता केसकर शर्वरी कुदळे या विद्यार्थ्यांनी तसेच शिक्षकांपैकी पल्लवी सपकाळ आणि अफिया शेख सूत्रसंचालन केले.

प्रथे प्रमाणे वार्षिक बक्षीस वितरण समारंभ प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दिमाखात पार पडला. मुख्याध्यापकांनी वार्षिक अहवाल सादर केला. संचालक यश बांदल सर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. प्रमुख पाहुण्यांच्या हुकमी आणि आश्वासक भाषणानंतर उर्वरित सर्व सादरीकरण करण्यात आले. पुढील वर्षीच्या नियोजनास पाठबळ देणा –या उपक्रमांपैकी महत्वाचा एक म्हणून सर्व सहभागी विद्यार्थी विद्यार्थिनींचे मान्यवरां बरोबर फोटो घेण्यात आले. स्मृती रंजन करण्यासाठी गरजेचे असणारे हे फोटो शाळा आणि विद्यार्थीही सदैव जपून ठेवतील यात शंका नाही.

उत्कृष्ट सादरीकरण, कार्यक्रमाची नियोजन बद्ध आखणी, शाळेच्या नावलौकिकाला साजेसे बंटारा भवन, निवडक आणि सरावपूर्ण इयत्ता निहाय गाणी, नाट्य यांचे मनोज्ञ दर्शन आजच्या या कलाविष्कारातून घडले. स्नेहसंमेलनाची सांगता वंदेमातरम ने करण्यात आली.

You may have missed