September 8, 2024

Samrajya Ladha

पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल, बावधन ही कलेचा सांस्कृतिक वारसा जपण्यात यशस्वी : सुनील चांदेरे (उपाध्यक्ष पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक)

बावधन :

बावधन येथील पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन बुधवार, दिनांक 24/1/2024 रोजी बंतारा भवन येथे आयोजित करण्यात आले होते. “धरोहर द कल्चरल कार्निवल” ही संकल्पना केंद्रस्थानी ठेवून 650 मुलांनी आपले भव्य दिव्य असे कलागुण सादर केले. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीताने करण्यात आली. यावेळी नर्सरी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी आपले कलागुण सादर करून प्रेक्षकांची वाहवा मिळवली.

 

आयोजित स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून फक्त महाराष्ट्रातील नव्हे तर सर्व राज्यातील संस्कृती, परंपरा, जडणघडण, कला, साहित्य याचे अप्रतिम दर्शन प्रस्तुत करण्यात आले. कार्यक्रमाच्या सौंदर्यात भर घालण्याचे काम राम प्रतिष्ठान सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रभू श्रीरामांचा नेत्रदीपक नृत्याविष्कार सादर करून करण्यात आला. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावर आधारित नृत्य सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध नृत्यांना, गाण्यांना टाळ्यांच्या कडकडाटात प्रतिसाद मिळाला.

यावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे, माजी अध्यक्ष जिल्हा परिषद सविताताई दगडे, काँग्रेस मुळशी तालुकाप्रमुख श्री. गंगाराम मातेरे, माजी नगरसेवक श्री दिलीप वेडे पाटील, मा. नगरसेवक आल्पनाताई वर्पे, संचालक रत्नाई हॉटेल श्री. माऊली ज्ञानेश्वर पवळे, उद्योजक बाळासाहेब काटे, उपाध्यक्ष भाजप पुणे शहर गणेश भाऊ वर्पे, इंटरनॅशनल कुस्तीपटू सानिया पप्पू कंधारे, सभापती महादेव कोंढरे, सरपंच सुनील जाधव, तसेच संदीप ढमढेरे, पत्रकार सचिन विटकर, पत्रकार रमेश ससार,पत्रकार पप्पू शेठ कंधारे हे मान्यवर उपस्थित होते. सर्व मान्यवरांच्या हस्ते विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना बक्षिसे प्रदान करण्यात आली. याप्रमाणेच सर्व मान्यवरांचा पुष्पगुच्छ, नारळ,शाल व धरोहर या संकल्पनेस साजेसे श्रीरामांच्या प्रतिमेचे स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

चैतन्य विद्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष व संस्थापक श्री. राजेंद्र बांदल सर व संचालिका सौ.रेखा बांदल यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व युवा संचालक श्री.यश बांदल सर यांनी संस्थेच्या पुढच्या वाटचालींची माहिती दिली. तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. स्वाती कोल्हे यांनी प्रास्ताविकेतून शाळेच्या विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली.

पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष श्री सुनील चांदेरे सर यांनी “धरोहर द कल्चरल कार्निवल” ही संकल्पना अतिशय विस्तृतपणे मांडून पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल, बावधन ही कलेचा सांस्कृतिक वारसा जपण्यात पुन्हा एकदा यशस्वी झाली आहे. असे प्रतिपादन केले व पेरिविंकलचा चढता आलेख असाच उत्तरोत्तर प्रगती करू दे अशी आशा व्यक्त केली.

उपस्थित मान्यवर श्री. गंगाराम मातेरे सर यांनी या स्नेहसंमेलनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या नृत्याविष्कारासाठी व व्यवस्थापनेसाठी पेरीविंकलच्या मुख्याध्यापिका सौ.स्वाती कोल्हे व सर्व शिक्षकांना कौतुकाची थाप दिली तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाचे नियोजन पेरिविंकल स्कूलच्या मुख्याध्यापिका व सौ.स्वाती कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षिका ऋचा हल्लूर, इंदू पाटील, रश्मी पाथरकर,कल्याणी शेळके, रश्मी बेलोकर यांनी केले. कार्यक्रमाचे अतिशय सूत्रसंचालन ऋचा हल्लूर, सायली गायकवाड, सरोज पुजारी व विद्यार्थ्यांनी केले.