आयोध्येत पंकज महाराजांना किर्तनासाठी न्यासाकडून निमंत्रण
पुणे :
आयोध्येतील श्रीराम जन्मभूमी श्रीराम लल्लाच्या प्रतिष्ठापनेनंतर प्रथमच किर्तन करण्याचा मान पुण्यामधील सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ. प. पंकज महाराज गावडे यांना मिळाला आहे. याबद्दल चैतन्य विद्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र बांदल परिवाराकडून पंकज महाराजांचा सर्वप्रथम सत्कार करण्यात आला.
शिवजयंती पूर्वसंध्येला मराठमोळया किर्तनकराच्या हरिनामाने रामजन्मभूमी दुमदुमणर आहे. १८ फेब्रुवारीला दुपारी 3 ते 5 वेळेत श्रीराम मंदिराच्या भव्य प्रांगणामध्ये पंकज महाराज यांचे किर्तन ऐकण्यास जगभरातून विविध मान्यवर येणार आहेत. गावडे महाराजांना किर्तनासाठी 2 गायक, 2 मृदुंग वादक व 1 हार्मोनियम वादक साथ देणार आहेत. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव महंत नृत्यगोपाल दास यांनी ह भ पंकज महाराज गावडे यांनाशपत्र पाठवून निमंत्रण दिले आहे.
आयोध्येतील किर्तन सेवेसाठी निमंत्रण केल्यानंतर बावधनमध्ये पंकज महाराज गावडे यांचा चैतन्य विद्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र बांदल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी यश बांदलसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
500 वर्षानंतर पुन्हा त्या ठिकाणी श्री राम लल्लाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर त्या ठिकाणी मला किर्तन करण्याची संधी तेथील न्यासाच्या वतीने देण्यात आली हे मी माझे महतभाग्य समजतो असे त्यांनी सांगितले. हभप पंकज महाराज गावडे हे अनेक वर्षांपासून कार्पोरेट क्षेत्रात कार्यरत होते. आता ते वारकरी संप्रदायातील प्रसिद्ध किर्तनाकर त्याचे नाव घेतले जाते.
More Stories
पेरिविंकल च्या सूस शाखेत महिलादिन रंगला शिक्षकांच्या स्नेहसंमेलनाने!!!….
पेरीविंकलच्या विद्यार्थ्यांची बावधन येथे भाजी मंडईला भेट..
बावधन येथे संत गाडगेबाबा महाराज जयंती निमित्त स्वच्छता बाबत जनजागृती रॅली…