बाणेर :
बाणेर बालेवाडी मेडिकल असोसिएशन ही सुमारे ४०० डॉ ची संघटना आहे.ह्या वर्षी डॉ व त्यांच्या कुटुंबीयांना साठी सुस् येथील सनीज वर्ल्ड येथे खेळांचे आयोजन दिनांक २१ जाने रोजी करण्यात आले होते. त्यात क्रिकेट, टेबल टेनिस, बॅडमिंटन, चेस,सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते.
क्रिकेट चे बेनिकेअर हॉस्पीटल, बाणेर डॉ. अभय खोडे, डॉ. शैलेश हाडगावकर, डॉ. अक्षया जैन, डॉ. चिन्मय उमर्जी यांचे संघ होते. सामन्यात बेनिकेअर हॉस्पीटल विजेते ठरले.
टेबल टेनिस व बॅडमिंटन मध्ये डॉ राहुल कोठारी विजेते ठरले. मुलांसाठी सुद्धा खेळांचे आयोजन करण्यात आले होते. बाणेर बालेवाडी मेडिकल असोसिएशन स्पोर्ट कमिटी चे चेअरमन डॉ. अमोल जामखंडे, डॉ नारायण जेठवणी ,डॉ प्रणव राडकर व सगळ्या कमिटी नी स्पोर्ट डे यशस्वी करण्यासाठी विशेष सहकार्य केले.
बक्षीस वितरण हे सायंकाळी कीर्ती गार्डन येथे आयोजित करण्यात आले होते. ह्या प्रसंगी पुण्याचे डी सी पी श्री संदीप सिंह गील तसेच स्थायी समितीचे माजी चेअरमन बाबुराव चांदेरे, औंध पोलिस स्टेशन पी. आय. पांढरे, पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल दादा बालवडकर,सौ पूनम विधाते, सौ बालवडकर उपस्थिती होते.
बाणेर बालेवाडी मेडिकल असोसिएशन चे संस्थापक अध्यक्ष डॉ राजेश देशपांडे, अध्यक्ष डॉ कविता चौधरी, सचिव डॉ. सुषमा जाधव, कोषाध्यक्ष डॉ. बबन साळवे, डॉ. सागर सुपेकर यांनी विशेष सहकार्य केले.
More Stories
नवीन समाविष्ट ३४ गावांच्या ९ नियुक्त लोकप्रतिनिधी मध्ये बाबुराव चांदेरे यांची वर्णी, महाराष्ट्र शासनाकडून अध्यादेश जारी..
सूसगाव येथील बेलाकासा सोसायटीजवळ बांधकाम साईटवर काम करणाऱ्या कामगारांच्या वसाहतीत आग, वीस घरे जळून खाक, तीन सिलिंडर चे स्फोट…
पेरिविंकल च्या सुस शाखेत प्री -प्रायमरीतील चिमुकल्यांचा पदवीदान समारंभ उत्साहात संपन्न!!!