April 12, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

सूसगावात अयोध्येतील प्रभू श्री राम लल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त भक्त राम नामात तल्लीन..

सूसगाव :

सूसगावात अयोध्येतील प्रभू श्री राम लल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त संपूर्ण ग्रामस्थ, सोसायटी वर्ग, व्यापारी संघटना, राजकीय, सामाजिक, क्रीडा, आणि सांप्रदायिक क्षेत्रातील सर्वांनी एकत्र येऊन विविध कार्यक्रम आयोजित करत मोठया उत्साहात आणि जल्लोषात श्री राम लल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळा साजरा केला.

 

सकाळपासून संध्याकाळपर्यंत विविध कार्यक्रम घेत मोठया उत्साहात सोहळा आनंद उत्सव साजरा करण्यात आला. प्रभू श्री राम लल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळा दिवशी सूसगावात भैरवनाथ मंदिरात सकाळी काकड आरती ने सुरूवात करण्यात आली. नंतर युवा कीर्तनकार हभप शेखर महाराज जांभूळकर यांचे प्रवचन आणि दुपारी ज्ञानज्योत महिला भजनी मंडळची भजन सेवा झाली. परीसरात प्रथमच भव्य दिव्य मिरवणूक झाली.

सायंकाळी ससार ग्रीन पार्क ते भैरवनाथ मंदिर अशी भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी संपूर्ण सुसगाव ग्रामस्थ, महिला, लहान मुले, सोसायटी हजारोंच्या संख्येने सामील होऊन राम नामात तल्लीन झाले. तदनंतर दीपोत्सव ने संपुर्ण परीसर लखलखीत झाला.

यावेळी कारसेवक श्री.वाल्मिकतात्या चांदेरे , कै.दत्तात्रय ससार यांचे चिरंजीव गौरव दत्तात्रय ससार यांचा प्रभू श्रीराम ची प्रतिमा शाल श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले त्या कारसेवकांच्या शुभहस्ते महाआरती घेण्यात आली. त्यानंतर अखिल सुसगांव व्यापारी संघटना च्या वतीने महाप्रसाद आयोजन केले होते.