सुसगाव :
सुसगाव येथे बाळासाहेब चांदेरे पाटील(शिवसेना जिल्हाप्रमुख मा. पंचायत समिती सभापती मुळशी) यांच्या वाढदिवसानिमित्त नारायण श्रीहरी चांदेरे पाटील (माजी सरपंच/अध्यक्ष मुळशी तालुका खादी ग्रामोद्योग/चेअरमन श्रीराम नागरी सहकारी पतसंस्था बाणेर/संस्थापक अध्यक्ष श्री गुरुदत्त चॅरिटेबल ट्रस्ट) यांच्या वतीने लहान मुलींसाठी सुकन्या समृद्धी योजना व नागरिकांसाठी मोफत आधार कार्ड अभियान सोमवार दिनांक १५/१/२०२४ ते २०/१/२०२४ वाजे पर्यंत नारायण चांदेरे जनसंपर्क कार्यालय विठोबा माथा, ठकसेन नगर सुस-नांदे रस्ता, सुसगाव येथे आयोजित केले आहे. या अभियानाचे उद्घाटन राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब सुतार यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
बाळासाहेब चांदेरे पाटील यांचा वाढदिवस नेहमीच सामाजिक उपक्रमातून साजरा केला जात असतो. म्हणूनच यावर्षी देखील परिसरातील लहान मुलींना आवश्यक असणारी सुकन्या समृद्धी योजना घरा घरात पोहचावी या उद्देशाने तसेच आधार कार्डची आवश्यकता लक्षात घेऊन नागरिकांची गैरसोय दुर व्हावी या करिता आधार कार्ड अभियान आयोजित केले असून जास्तीत जास्त नागरिकांनी या अभियानाचा लाभ घ्यावा : नारायण चांदेरे पाटील((माजी सरपंच/अध्यक्ष मुळशी तालुका खादी ग्रामोद्योग/चेअरमन श्रीराम नागरी सहकारी पतसंस्था बाणेर/संस्थापक अध्यक्ष श्री गुरुदत्त चॅरिटेबल ट्रस्ट)
यावेळी संतोष शेळके शिवाजीनगर हेड काॅटर पोस्ट ऑफिस, औंध पोस्ट ऑफिस मधून सौ.अश्विनी पोतदार, गणेश खिंड पोस्ट ऑफिस मधून निलेश बांदल, मा.चेअरमन दत्तात्रय चांदेरे, मा.उपसरपंच गणेश आबा ससार, व्हाईस चेअरमन ह.भ.प सोपानराव चांदेरे, मा.तंटामुक्ती अध्यक्ष रोहिदास चांदेरे, निवृत्त पुणे शहर पोलीस बाबासाहेब ससार, रामभाऊ साबळे, युवा उद्योजक बजरंग चांदेरे, संदिपभाऊससार, रुपेशभोते, मारुती ससार, सामाजिक कार्यकर्ते दशरथ आप्पा ससार, संपत आप्पा चांदेरे, संजय सुतार, तुकाराम चांदेरे , अतुल खांदवे, खेमराज खेतावत, ज्ञानेश्वर चांदेरे, अमृत चांदेरे आदी मान्यवर उपस्थित होते.
More Stories
नवीन समाविष्ट ३४ गावांच्या ९ नियुक्त लोकप्रतिनिधी मध्ये बाबुराव चांदेरे यांची वर्णी, महाराष्ट्र शासनाकडून अध्यादेश जारी..
सूसगाव येथील बेलाकासा सोसायटीजवळ बांधकाम साईटवर काम करणाऱ्या कामगारांच्या वसाहतीत आग, वीस घरे जळून खाक, तीन सिलिंडर चे स्फोट…
पेरिविंकल च्या सुस शाखेत प्री -प्रायमरीतील चिमुकल्यांचा पदवीदान समारंभ उत्साहात संपन्न!!!