September 8, 2024

Samrajya Ladha

म्हाळुंगे गावच्या नागरीकांच्या समस्यांवर उपाय योजना करण्यासाठी अमोल बालवडकर यांनी केली पाहणी..

म्हाळुंगे :

म्हाळुंगे येथील शितळादेवी परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून ड्रेनेज समस्या, कचरा समस्या, अपूर्ण रस्ते, बंद पडलेले पथदिवे या समस्यांमुळे नागरीक तक्रार करत होते. या समस्यांवर उपाय योजना कराव्यात म्हणून माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी ग्रामस्थांसोबत समस्या असणाऱ्या जागेवर जाऊन पाहणी केली. ड्रेनेजच्या गंभीर प्रश्नावर उपाययोजना करण्याकरीता पुणे महानगरपालिका मलःनिसारण विभागाचे उपअभियंता सुहास अलभर यावेळी उपस्थित होते.

 

नव्याने समाविष्ट सुस-म्हाळुंगे गावांचा डिपीआर तयार आहे व लवकरच या गावांकरीता निधी उपलब्ध होणार आहे. तरी येथिल ड्रेनेजच्या समस्यामुळे परिसरातील नागरीकांच्या आरोग्याला होणारा धोका पाहता पहिल्या फेज मध्ये प्रायोगिक तत्वावर पुणे महानगरपालिकेने तातडीने ८ कोटी रुपयांचा निधी सदर परिसरात नविन ड्रेनेज लाईन विकसित करण्याकरता उपलब्ध करुन देण्याची मागणी मी मा.महापालिका आयुक्त यांच्याकडे करणार आहे : माजी नगरसेवक अमोल बालवडकर

तसेच परिसर कचरा मुक्त करण्यासाठी योग्य ती उपाय योजना तातडीने राबविण्याची सुचना देखिल क्षेत्रिय कार्यालयाअंतर्गत आरोग्य विभागाच्या प्रमुखांना केली. लवकरात लवकर या परिसरातील रस्त्यांवरचे पथदिवे तातडीने सुरु करण्यास संबंधित विद्युत विभागातील अधिकार्यांना कळवले असल्याचे अमोल बालवडकर यांनी कळविले आहे.

यावेळी भाजपा नेते मा.सरपंच काळुराम गायकवाड, मा.उपसरपंच स्मिताताई पाडाळे, मनोज पाडाळे, बाप्पु शेडगे, रणजित मोहोळ तसेच परिसरातील अनेक नागरीक व सोसायटीतील ज्येष्ठ नागरीकउपस्थित होते.