गणेशखिंड :
गणेशखिंड येथील माॅडर्न महाविद्यालयातील टी वाय बी ए समाजशास्त्र विभागातील कु प्रणिता मोरे हिची
दिल्लीमध्ये येत्या 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या संचालनात “ प्लाटून कमांडर ऑल इंडिया गार्ड ऑफ आँनर”ऑफ गर्ल्स प्लाटून फाॅर प्रायमिनिस्टर रॅली न्यू दिल्ली येथे निवड झाली आहे. एनसीसी मध्ये तिसऱ्या वर्षातील सीनियर अंडर ऑफिसर प्रणिता मोरे २ महाराष्ट्र गर्ल बटालियन पुणे येथील कॅडेट आहे.
पंतप्रधान गार्ड आँफ आँनर या रायफलधारी गटाच्या गार्ड ऑफ ऑनरसाठी महाराष्ट्रातून 10 कॅडेट्स निवड झाली असुन या 10 कॅडेट्समध्ये 7 मुले आणि 3 मुली आहेत.यावर्षी पुण्यातून कुमारी प्रणिता मोरे हिची निवड झाली आहे.
प्राचार्य संजय खरात म्हणाले की, कु प्रणिता मोरे हिच्या कष्टाचा व मेहनीताचा काॅलेजला अभिमान आहे व हा आमच्यासाठी अविस्मरणीय क्षण आहे. विद्यार्थिनीची या परेडसाठी निवड होणे हा ईतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा देणारी बाब आहे.
या विषयी बोलताना तिचे वडील म्हणाले,”हा अभिमानाचा क्षण आहे. परेडमध्ये तिची निवड होण्याचे कारण म्हणजे तिची मेहनत, समर्पण आणि चिकाटी आहे.” तिची आई सौ कविता मोरे या गृहिणी असुन बहिण वैष्णवी मोरे ही पदवीधर असुन भाऊ सिध्दार्थ मोरे हा दहावीत शिकत आहे.
या यशासाठी तिला कर्नल व्ही के .मल कमांडिंग ऑफिसर २ महाराष्ट्र गर्ल्स बटालियन यांचे प्रचंड सहकार्य लाभले. यात ब्रिगेडियर अर्जुन मित्रा, ग्रुप कमांडर, पुणे ग्रुप हेडक्वार्टर यांचे सतत मार्गदर्शन होते.
या यशात प्राचार्य डॉ संजय खरात , उपप्राचार्य डॉ ज्योती गगनग्रास , लेफ्टनंट डॉ. प्रतिभा राव असोसिएट अधिकारी एनसीसी मॉडर्न कॉलेज गणेशखिंड यांचे मोठे सहकार्य आहे.
कार्यक्रमासाठी पी ई सोसायटीचे सहकार्यवाह प्रा सुरेश तोडकर व उपकार्यवाह डाॅ प्रकाश दिक्षित यांनी खुप प्रशंसा केली.
More Stories
गणेशखिंड येथील मॉडर्न महाविद्यालयात मानसशास्ञाचा ‘कॅलिडोस्कोप १६’ अंकाचे प्रकाशन
औंध येथील अमोल दत्तात्रय टेंबरे यांना भारत भूषण पुरस्कार प्रदान…
ग्राफिटीच्या हौशी कलाकारांचे चित्र प्रदर्शन संपन्न…