सूस :
सुस येथील बेला कासा सोसायटीमधील नागरिकांना त्यांच्या सदनिकांच्या मिळकत करासंदर्भात पुणे महानगरपालिका (पुणे मनपा) प्रणालीमध्ये काही अडचणी येत होत्या. यासंदर्भात सोसायटीतील रहिवाशांनी माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांच्याकडे तक्रार केली होती. यावर तातडीने उपाययोजना करत श्री. बालवडकर यांनी पुणे मनपा कर संकलन विभागाचे अधिकारी श्री. हनुमंत आडागळे यांच्यासमवेत सोसायटीतील नागरिकांची प्रत्यक्ष बैठक आयोजित केली.
या बैठकीमध्ये अमोल बालवडकर यांनी नागरिकांशी संवाद साधला. यावेळी सदनिकाधारकांनी त्यांच्या करांसंबंधी विविध समस्या मांडल्या, ज्यात प्रामुख्याने करात ४०% सवलत मिळण्यात येणाऱ्या अडचणी, अतिरिक्त लावण्यात आलेला कर आणि कर पावतीवरील नाव बदल यांसारख्या समस्यांचा समावेश होता.
पुणे मनपाचे अधिकारी श्री. हनुमंत आडागळे यांनी सर्व सदनिकाधारकांच्या समस्या ऐकून घेतल्या आणि त्यांचे निराकरण केले. बैठकीमध्ये अनेक समस्यांवर तातडीने तोडगा काढण्यात आला, ज्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी माजी नगरसेवक अमोल बालवडकर, पुणे मनपा कर संकलन विभागाचे अधिकारी श्री. हनुमंत आडागळे, कृत टीमचे सदस्य आणि बेला कासा सोसायटीमधील सर्व सदनिकाधारक उपस्थित होते. नागरिकांच्या समस्यांचे त्वरित निवारण केल्याबद्दल सोसायटीतील सदस्यांनी समाधान व्यक्त केले.



More Stories
पेरिविंकलचा ‘यशदीप’ पुन्हा तेजाने उजळला; SSC बोर्डात घवघवीत यशाची परंपरा कायम!
पेरीविंकलच्या सुस शाखेत इ.12वी नंतर 10वीत देखील १००% निकालाच्या इतिहासाची पुनरावृत्ती!! पेरीविंकल च्या अवंतिकाने मारली बाजी!!
पेरीविंकल शाळेच्या पौड शाखेच्या पहिल्याच दहावी बॅचचा शंभर टक्के निकाल; गुणवंत विद्यार्थ्यांचे घवघवीत यश!!!!