पौड :
पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल, पौड येथील विद्यार्थ्यांनी तायक्वांदो चॅम्पियनशिप 2026 मध्ये उल्लेखनीय कामगिरी करत विविध पदकांची कमाई केली. माजी आमदार स्वर्गीय विनायक (आबा) निम्हण यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा दि. 22 व 23 ऑगस्ट 2026 रोजी पुणे येथील द पिरियड, सनीज वर्ल्ड येथे उत्साहात पार पडली.
या स्पर्धेत पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल, पौडच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कौशल्य, मेहनत, आत्मविश्वास आणि क्रीडावृत्तीचे प्रदर्शन करत शाळेचे नाव उज्ज्वल केले.
रौप्यपदक :
🥈 साई चव्हाण – वय 14 वर्षे, वजन 35 किलो
कांस्यपदक :
🥉 रुद्रांश शिलीमकर – वय 14 वर्षे, वजन 32 किलो
🥉 संग्राम ओव्हाळ – वय 14 वर्षे, वजन 48 किलो
🥉 अंजली जाधव – वय 14 वर्षे, वजन 30 किलो
🥉 रिया पवार – वय 12 वर्षे, वजन 38 किलो
विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शाळेचे अध्यक्ष आदरणीय राजेंद्र बांदल, संचालिका रेखा बांदल, डायरेक्टर शिवानी बांदल, प्रशालेच्या प्रमुख प्राचार्या निर्मल पंडित, मुख्याध्यापक वीणा कदम, शिक्षकवृंद व पालकांनी सर्व पदकविजेत्या विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
या यशामध्ये तायक्वांदो प्रशिक्षक प्रविण मोरे यांच्या मार्गदर्शनाचा, प्रशिक्षणाचा आणि मेहनतीचा मोलाचा वाटा आहे.
पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल, पौडच्या या युवा तायक्वांदो चॅम्पियन्सच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत असून, त्यांच्या पुढील क्रीडा वाटचालीसाठी शाळेच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.



More Stories
*‘भक्तीचा उत्सव, पर्यावरणाची जपणूक!’ — पेरिविंकल बावधनमध्ये विद्यार्थ्यांनी साकारल्या Eco-Friendly गणेशमूर्ती!!*
वसुंधरा अभियानाच्या २०व्या वर्धापनदिनानिमित्त राजाभाऊ गुडदे फाउंडेशनचा सन्मान
*पेरिविंकलमधील सुस शाखेच्या विद्यार्थ्यांच्या हातून साकारला ‘पर्यावरणपूरक गणराया’!* *शाडू माती गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळेतून परंपरेसोबत दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश!!!*