August 27, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

पेरिविंकलमध्ये रोबोटिक्सचा मेळावा; विद्यार्थ्यांच्या कल्पनांना तंत्रज्ञानाचे पंख

पिरंगुट :

चैतन्य विद्या प्रतिष्ठान संचालित पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पिरंगुट येथे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, सर्जनशीलता, तांत्रिक कौशल्ये आणि नवोन्मेषी विचारसरणी विकसित करण्याच्या उद्देशाने गुरुवार, दि. २७ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० वाजता शाळेच्या परिसरात ‘रोबोटिक्स लाईव्ह डेमो’चे आयोजन करण्यात आले .

 

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पालक शिक्षक समिती सभासद श्री.योगेश राऊत आणि सौ.स्वाती गाडेकर लाभले

या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांना रोबोटिक्स, कोडिंग, इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमेशन आणि तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव घेता आला. विद्यार्थ्यांना Think • Design • Build • Demonstrate या संकल्पनेतून स्वतःच्या कल्पनांना प्रत्यक्ष स्वरूप देण्याची संधी मिळाली. रोबोटिक्समधील प्रत्यक्ष कृती, प्रयोग आणि प्रकल्पाधारित शिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्याची क्षमता, तार्किक विचार, सर्जनशीलता आणि टीमवर्क यांना चालना मिळते.

या प्रदर्शनात इयत्ता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांचे विविध रोबोटिक्स प्रकल्प सादर केले. त्यामध्ये इयत्ता पहिलीचा Wind Turbine, दुसरीचा Rain Detector Device, तिसरीचा Sensor Based Touch Light, चौथीचा Traffic Light Using Arduino, पाचवीचा Electronic Dice, सहावीचा Obstacle Avoiding Robo Car, सातवीचा Gesture Based LED Light, आठवीचा Fire Fighting Robo Car आणि नववीचा Stone-Paper-Scissor Using Arduino या प्रकल्पांचा समावेश आहे.

या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना केवळ तंत्रज्ञान समजून घेण्याचीच नव्हे, तर कल्पना मांडणे, प्रत्यक्ष मॉडेल तयार करणे, त्याची चाचणी घेणे आणि त्यामध्ये सुधारणा करणे याचा अनुभव मिळाला आहे.

या कार्य शाळेचे प्रशिक्षक शिक्षक रोहित ससार आणि विश्वास माउंडेकर सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय प्रदर्शनाबद्दल चैतन्य विद्या प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. राजेंद्र बांदल सर, संचालिका सौ. रेखा बांदल, संचालिका कु. शिवानी बांदल, सर्व शाखा प्रमुख सौ. निर्मल पंडित, मुख्याध्यापिका सौ. इनायत मुजावर, पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख सौ. पल्लवी नारखेडे, प्राथमिक विभाग प्रमुख सौ. सना इनामदार, माध्यमिक विभाग प्रमुख सौ. रुपाली गर्ग आणि संपूर्ण शिक्षकवृंदानी सर्व विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन करून कौतुक केले

“Build Your Ideas. Showcase Your Talent. Be the Innovator!” या प्रेरणादायी संदेशासह आयोजित या उपक्रमात विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी सहभागी होऊन विद्यार्थ्यांच्या नावीन्यपूर्ण कल्पनांना प्रोत्साहन देऊ, असे आवाहन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ इनायत मुजावर यांच्या वतीने करण्यात आले आहे.