पाषाण :
पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज, पिरंगुट येथील विद्यार्थ्यांनी तायक्वांदो चॅम्पियनशिप 2026 मध्ये उत्साहाने सहभाग घेत उत्कृष्ट कामगिरी केली. ही स्पर्धा माजी आमदार स्वर्गीय विनायक (आबा) निम्हण यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित करण्यात आली होती. ही स्पर्धा दि. 22 व 23 ऑगस्ट 2026 रोजी द पिरियड, सनीज वर्ल्ड, पुणे येथे पार पडली.
या स्पर्धेत पेरिविंकलच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट तायक्वांदो कौशल्य, मेहनत, आत्मविश्वास आणि क्रीडावृत्तीचे प्रदर्शन करत १ सुवर्ण, ७ रौप्य आणि ८ कांस्य पदके मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले.
🥇 सुवर्णपदक
– शौर्य सनस – वय 14, वजन 76 किलो
🥈 रौप्यपदके
– ईश्वरी शेमडे – वय 14, वजन 40 किलो
– अनन्या जाधव – वय 14, वजन 32 किलो
– हिंदवी गुरव – अंडर-9, वजन 22 किलो
– वेदांत रानानवरे – वय 12, वजन 41 किलो
– कौस्तुभ मोरे – अंडर-9, वजन 27 किलो
– ऋतुराज शिंदे – वय 13, वजन 58 किलो
– गौरव साळवे – वय 15, वजन 43 किलो
🥉 कांस्यपदके
– उन्नती शिंदे – वय 14, वजन 45 किलो
– प्रांजल निकाते – वय 11, वजन 32 किलो
– नंदिनी पाटील – वय 13, वजन 40 किलो
– स्वराज गुरव – वय 12, वजन 42 किलो
– कृष्णा भारती – वय 13, वजन 44 किलो
– मोईनुद्दीन खान – वय 14, वजन 45 किलो
– सुमित पावले – वय 13, वजन 51 किलो
– अंश मराठे – वय 10, वजन 21 किलो
या सर्व विजेत्या खेळाडूंना तायक्वांदो प्रशिक्षक प्रवीण मोरे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल चैतन्य विद्या प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. राजेंद्र बांदल सर, संचालिका सौ. रेखा बांदल, संचालिका कु. शिवानी बांदल, सर्व शाखा प्रमुख सौ. निर्मल पंडित, मुख्याध्यापिका सौ. इनायत मुजावर, पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख सौ. पल्लवी नारखेडे, प्राथमिक विभाग प्रमुख सौ. सना इनामदार, माध्यमिक विभाग प्रमुख सौ. रुपाली गर्ग आणि संपूर्ण शिक्षकवृंदाने सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन करून कौतुक केले.
पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल आणि जुनियर कॉलेज, पिरंगुट शाळेला आपल्या सर्व युवा तायक्वांदो चॅम्पियन्सचा अभिमान आहे. सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा! 🥋🏆





























More Stories
सूस-नांदे परिसरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांचा आणि सनीज वर्ल्डचा पुढाकार
बाणेर जलतरण तलावात दीड लाखाचे युनिट साडेनऊ लाखांना? कोथरूडमधील जलतरण तलावांच्या कामात ३८ लाखांच्या खर्चावरून अमोल बालवडकर यांची चौकशीची मागणी
कोथरूड मतदारसंघातील प्रभाग क्रमांक ९ च्या विकासकामांचा निधी रद्द; राजकीय वैमनस्यातून जनतेच्या कामात खोडा : अमोल बालवडकर