August 24, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बाणेर जलतरण तलावात दीड लाखाचे युनिट साडेनऊ लाखांना? कोथरूडमधील जलतरण तलावांच्या कामात ३८ लाखांच्या खर्चावरून अमोल बालवडकर यांची चौकशीची मागणी

बाणेर :

कोथरूड विधानसभा मतदारसंघातील बाणेर परिसरातील जलतरण तलावांवर बसवण्यात आलेल्या UV (अल्ट्राव्हायोलेट) प्रणालीच्या खर्चावरून राजकीय वातावरण तापले आहे. आमदार स्थानिक विकास निधीअंतर्गत आमदार चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून झालेल्या या कामात मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप पुणे महापालिकेच्या स्थायी समितीचे सदस्य व नगरसेवक अमोल बालवडकर यांनी केला आहे.

 

मुख्य मुद्दे:

 खर्चातील मोठी तफावत: संबंधित ‘आर्कलाईट’ कंपनीच्या कोटेशननुसार एका UV युनिटची किंमत सुमारे ₹१.५० लाख असताना, प्रत्यक्षात एका युनिटसाठी ₹९.५३ लाख खर्च दाखवण्यात आला आहे.

 एकूण खर्च: चार ठिकाणच्या कामासाठी तब्बल ₹३८ लाख १५ हजार ६०० इतका निधी खर्च दाखवण्यात आला आहे.

 सखोल चौकशीची मागणी: सार्वजनिक पैशांचा अपव्यय झाल्याचा आरोप करत बालवडकर यांनी निविदा प्रक्रिया, दरांची निश्चिती, कामाची प्रत्यक्ष गरज आणि देयकांची पारदर्शक चौकशी करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. विशेष म्हणजे कोथरूड विधानसभा मतदारसंघात आमदार निधीच्या कामाचे ऑडिट करण्यात यावे ही मागणी केल्याने अमोल बालवडकर यांचा विकास निधी शून्य केला आहे. तरी त्यांची आक्रमकता कमी झाली नाही.

दरम्यान, या प्रकरणात अधिकृत कागदपत्रे व निविदा प्रक्रियेच्या पडताळणीनंतरच संपूर्ण सत्य समोर येणार असून, आता आमदार चंद्रकांत पाटील आणि संबंधित प्रशासन यावर काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

You may have missed