September 8, 2024

Samrajya Ladha

प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचा गुरूवर्य शंकरराव कानिटकर पुरस्कार कृष्णकुमार गोयल यांना प्रदान..

पुणे :

प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या गुरूवर्य शंकरराव कानिटकर या पुरस्कार सन्मान सोहळयात श्री सुधीरजी मुनगंटीवार, वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री, महाराष्ट्र राज्य यांनी संस्थेचे प्रेम हे व्याजासकट परतफेड करण्याचा प्रयत्न करेन अशी भावना व्यक्त केली.गुणवान व्यक्ती व सामजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील अग्रेसर असणारे कृष्णकुमार हे पुण्यातील कोहिनुर आहेत म्हणून हा पुरस्कार त्यांना देण्यात विशेष आनंद आहे.

 

या वर्षीचा हा पुरस्कार मा श्री कृष्णकुमार गोयल, अध्यक्ष, खडकी एज्युकेशन सोसायटी, पुणे यांना त्यांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव म्हणून मा आ श्री सिध्दार्थजी शिरोळे, सदस्य, विधानसभा महाराष्ट्र राज्य, डाॅ नितीन करमळकर, माजी कुलगुरु, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या हस्ते श्री सुधीरजी मुनगंटीवार, वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या आँनलाईन उपस्थितीत देण्यात आला.

८९ वर्षाची दैदीप्यमान परंपरा लाभलेल्या प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक गुरूवर्य श्री शंकरराव कानिटकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ दिला जाणारा हा सन्मान शैक्षणिक, सामाजिक,राजकिय, सांस्कृतिक, औद्योगिक आणि वैद्यकिय अशा नामवंत क्षेत्रात कामगिरी
करणार्या व्यक्तीस हा सन्मानाचा हा पुरस्कार दिला जातो.

पी ई सोसायटीचे कार्याध्यक्ष मा डाॅ गजानन एकबोटे म्हणाले,” १९९५ साली उत्तुंग यश मिळविणार्या व्यक्तिमत्वांना हे पुरस्कार देण्यात आले आहे. कृणकुमार गोयल यांनी प्रत्येक क्षेत्रात उत्तुंग यश मिळालेले आहे. अतिशय योग्य व्यक्तीची निवड संस्थेने केली आहे.”

आमदार सिध्दार्थ शिरोळे म्हणाले गोयल साहेबांचे आणि माझे मैत्रीचे व जिव्हाळ्याचे संबंध आहेत. ते जे हतात घेतात त्याचे सोने करतात. असे व्यक्तिमत्व समाजात आशावाद निर्माण करतात. या व्यक्तीला पुरस्कार देणे हा सुवर्णयोग आहे.
गुणवान लोकांना प्रोत्साहन देण्याचा या भूमीचा प्रघात आहे. तीच परंपरा कायम ठेऊन समाजातील चांगले काम करणार्या व्यक्तीला हा पुरस्कार दिला आहे असे मा प्रा डाॅ नितीन करमळकर म्हणाले.

पुरस्कार स्वीकारताना श्री गोयल म्हणाले माझ्यासाठी हा क्षण हा स्वप्नवत आहे. या नामवंत अशा मुहूर्तमेढ रोवणार्या गुरुवर्यांच्या नावाने हा पुरस्कार मिळाला आहे हा माझा सन्मान आहे. अत्यंत खडतर परिस्थितीवर मात करुन मी सर्व क्षेत्रात पुढे जाण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.शैक्षणिक क्षेत्र हे माझ्या जिव्हाळ्याचे आहे. मोठी स्वप्न बघा,इच्छाशक्ती ठेवा. जो विचार करता तो पूर्ण करा.

या प्रसंगी एन सी एल माॅडर्न हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राची लोकधारा व शिवराज्याभिषेक सोहळा हा कार्यक्रम सादर केला. कार्यक्रमाची सुरवात सौ क्षिप्रा पंढरपुरे यांच्या ईशस्तवनाने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पी ई सोसायटीचे कार्यवाह प्रा शामकांत देशमुख यांनी केले.पाहुण्यांचा परिचय पी ई सोसायटीचे उपकार्यवाह डाॅ निवेदिता एकबोटे यांनी केले. मानपत्राचे वाचन डाॅ वैजयंती जाधव यांनी केले. आभार प्रदर्शन पी ई सोसायटीचे सहकार्यवाह प्रा सुरेश तोडकर यांनी केले. पसायदान सौ स्वाती पाटणकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन पी ई सोसायटीचे सहकार्यवाह प्रा डाॅ सौ जोत्स्ना एकबोटे यांनी केले.

या कार्यक्रमाला संस्थेचे सर्व पदाधिकारी, नियामक मंडळाचे सदस्य, सर्व शैक्षणिक संस्थांचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.