बाणेर :
बाणेर येथे माजी नगरसेविका ज्योती कळमकर आणि गणेश कळमकर यांच्या वतीने अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिर लोकार्पण व श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त सोमवार दिनांक २२ जानेवारी २०२४ रोजी ह भ प विक्रम महाराज काळे यांचे किर्तन झाले. हजारो लोकांनी महाप्रसाद घेतला. अयोध्या येथून थेट प्रेक्षपण पाहिले. प्रभू श्रीरामांची महाआरती केली. यावेळी कॅबिनेट मंत्री आदरणीय चंद्रकांतदादा पाटील यांनी कार्यक्रमाला भेट देत सर्वांचा उत्साह वाढविला.
आपल्या सर्व भारतीयांची ५०० वर्षापासून ची प्रतीक्षा संपुष्टात येऊन आयोध्या येते प्रभू श्रीराम लल्ला विराजमान झाले. हि बाब आपणा सर्वांसाठी आनंदाची, अभिमानाची, बाब असून या सोहळ्यानिमित्त दिवाळी साजरी करण्यात आली. असा अविस्मरणीय जल्लोष सदैव आठवणीत राहणार आहे. हा ऐतिहासिक क्षण सदैव आपल्या आठवणीत राहील जय श्री राम : गणेश कळमकर(उपाध्यक्ष भाजपा पुणे शहर)
संध्याकाळी बाणेर येथील ह भ प बाबुराव सायकर (गणराज )चौकात जोरदार जल्लोष करून आनंद व्यक्त केला. महिलांनी फुगड्या खेळल्या तर मुलांनी भगव्या पताका फडकवल्या, फटाके फोडले,सगळ्यांनी प्रभू श्रीरामच्या भजनावर ठेका धरला खरच सगळीकडे आनंदी आनंद जोरदार आतिषबाजी करून दिवाळी साजरी करण्यात आली.
गणेश कळमकर यांनी आव्हान केल्यानंतर बाणेर गावातील ग्रामस्थ सर्व पक्षीय राजकीय नेत्यांनी एकत्र येत बाणेर येथील हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज स्मारक व भारत रत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक गावातील सर्व मंदिरे स्वच्छ केली. गावातील सर्व मंदिरांना विद्युत रोषणाई केली. अशा प्रकारे विविध कार्यक्रम आयोजित करून प्रभू श्रीराम मंदिर लोकार्पण व श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त तयारी कळमकर परिवाराने केली आणि श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठया उत्साहात साजरा केला.
More Stories
बालेवाडी येथे स्त्री फाउंडेशनकडून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांची सन्मान..
बालेवाडी येथे अमोल बालवडकर फाउंडेशन तर्फे हॅप्पी स्ट्रीट-2024 चे आयोजन…
श्री क्षेत्र बाणेश्वर देवस्थान बाणेर येथे महाशिवरात्र आणि वर्धापन दिन उत्साहात साजरा…