February 4, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

प्रभू श्रीरामांचे आगमन अयोध्या मध्ये , जल्लोष बाणेर येथे युथिकामध्ये…

बाणेर :

प्रभू श्रीरामांचा स्वागत उत्सव युथिका सोसायटीमध्ये अतिशय उत्साही रीत्या साजरा करण्यात आला. सर्व रहिवास्यांनी अगदी मनोभावी रांगोळ्या, पताका, झेंडे, दीपोत्सव, रामनाम जप, रामरक्षा, राम भजन, फटाक्यांची आतिषबाजी आणि भव्य वाजतगाजत अशी मिरवणुक काढुन साजरी केला.

पहाटे युथिका अपार्टमेंट बाणेर येथे ढोल ताशा सह भव्य शोभा यात्रा काढण्यात आली. मुलांनी राम, सीता आणि लक्ष्मणाची वेशभूषा केली होती. शोभा यात्रेनंतर श्रीगणेश व श्रीराम आरती झाली. संध्याकाळी भजन संध्या आणि दीपोत्सव सोहळा झाला. एकूण 600 लोक उपस्थित होते.

यावेळी केदार साबणे,आनंद देवस्थळे, सचिन कळमकर, राहुल जोशी, अभिजीत नरगुंडे, गणेश नायर, दुष्यंत बेथारिया, दीपक सिंग आदी मान्यवर उपस्थित होते.