बालेवाडी :
काल अयोध्या येथे प्रभू श्रीराम लल्ला लोकार्पण तसेच प्रतिष्ठापना सोहळा उत्साहामध्ये पार पडला. या शुभमुहूर्तावर देशभरामध्ये आनंद आणि जल्लोषाचे वातावरण होते. याचं औचित्य साधून बालेवाडी मध्ये पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल बालवडकर यांच्या वतीने लाडू आणि पेढे वाटप करण्यात आले. याच आनंदाच्या शुभमुहूर्तावर राहुल दादा बालवडकर स्पोर्ट्स फाऊंडेशन तर्फे बालेवाडी येथे 220124 वेळा श्रीराम या नामाचा वापर करून श्रुती गावडे हिने भव्य दिव्य श्रीराम प्रभूंची रांगोळी रेखाटली होती. या भव्य दिव्य अशा रांगोळीला पाहण्यासाठी हजारोंची गर्दी झाली होती. याबद्दल रांगोळी रेखाटलेल्या श्रुती गावडे हिचा सन्मान स्थायी समितीचे मा. अध्यक्ष आणि नगरसेवक माननीय बाबुराव आप्पा चांदेरे साहेब यांच्या हस्ते करण्यात आला.
त्याचबरोबर यावेळी लहान मुलांच्या ड्रेपरी ची स्पर्धा सुद्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेल्या सर्व लहानग्यांना उतेजनार्थ भेटवस्तू देण्यात आली. लहानग्यांनी प्रभू श्रीराम आणि सितेची वेशभूषा अतिशय सुंदर अशी केली होती. यामधून क्रमांक काढून सर्वात सुंदर वेशभूषा असलेल्या लहान मुलांना स्थायी समितीचे मा. अध्यक्ष, नगरसेवक बाबुराव आप्पा चांदेरे यांच्या हस्ते बक्षीस देऊन सन्मान करण्यात आला.
या ड्रेपरी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आलेल्या अवधूत कस्पटे याला लॅपटॉप तसेच द्वितीय क्रमांक आलेल्या लक्ष राठोड ला टॅब आणि तृतीय क्रमांक आलेल्या सिद्धी राठोड या मुलीला स्मार्ट वॉच अशी बक्षीस देण्यात आली. त्याचबरोबर सहभाग घेतलेल्या भाग्यवंतां मधून महादेव लक्ष्मण अलीबडी, रमेश सिंग गुप्ता, बाबासाहेब मांडे, मानसी हिरेकोडी, ज्ञानेश्वर अंभोरे यांना लकी ड्रॉ मधून या भाग्यवंतांना निवडून त्यांना मोफत आयोध्या दर्शन देण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाच्या वेळी स्थायी समितीचे मा.अध्यक्ष, नगरसेवक बाबुराव आप्पा चांदेरे, समीर चांदेरे, नितीन कळमकर सर, ज्योती बालवडकर, पुनम ताई विधाते, मनोज बालवडकर, अर्जुन शिंदे, सुधाकर धनकुडे, अर्जुन रनवरे, अंकुश बालवडकर (माजी सरपंच ), विशाल गांधीले आणि त्यांच्यासह बाणेर बालेवाडी भागातील रामसेवक, ग्रामस्त तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यावेळी सर्वांचा सन्मान करण्यात आला.
More Stories
बालेवाडी येथे स्त्री फाउंडेशनकडून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांची सन्मान..
बालेवाडी येथे अमोल बालवडकर फाउंडेशन तर्फे हॅप्पी स्ट्रीट-2024 चे आयोजन…
श्री क्षेत्र बाणेश्वर देवस्थान बाणेर येथे महाशिवरात्र आणि वर्धापन दिन उत्साहात साजरा…