September 18, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बालेवाडी येथे अमोल बालवडकर यांच्या वतीने श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोध्या थेट लाईव्ह प्रक्षेपण, भजन आणि महाप्रसाद…

बालेवाडी :

बालेवाडी येथे अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिर लोकार्पण व रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या वतीने सोमवार दिनांक २२/१/२०२४ रोजी सकाळी ११:०० वाजता श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोध्या थेट लाईव्ह प्रक्षेपण तसेच भजन आणि भाविकांसाठी महाप्रसाद हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

प्रभू श्रीराम मंदिर लोकार्पण व रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळा आपणा सर्व भारतीयांसाठी अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण आहे. हा सुवर्ण क्षण सर्वांना एकत्रित बसुन पाहता यावा म्हणून थेट लाईव्ह प्रक्षेपण आयोजित केले असून नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हावे. बोलो जय श्री राम! : माजी नगरसेवक अमोल बालवडकर

स्थळ : कै. हिरामण शेठ बालवडकउद्यान, अष्टविनायक मंदिर समोर, ओरवी सोसायटी जवळ बालेवाडी
संयोजन : श्री अष्टविनायक मित्र मंडळ

 

 

You may have missed