November 21, 2024

Samrajya Ladha

बाणेर चे वैभव श्री क्षेत्र बाणेश्र्वर देवस्थान मंदिराचा होणार कायापालट, मान्यवरांच्या हस्ते विकास कामांचे भूमी पूजन संपन्न.

बाणेर :

श्री क्षेत्र बाणेश्र्वर देवस्थान (पांडवकालीन गुफा मंदिर) बाणेर येथे भव्य ५० फुटी आदियोगी शिवप्रतिमा, मंदिराच्या पश्र्चिम प्रवेश मार्गावर दगडी कमान, मंदिराच्या उत्तरेकडील भागास दर्शन मार्ग, मंदिराच्या पूर्वेकडील बाजूस ॲम्फीथिएटर संगित कारंजे या विविध विकास कामांचे भूमिपूजन ग्रामस्थ, सेवेकरी आणि मान्यवर यांच्या हस्ते संपन्न झाले.

ऐतिहासिक दृष्ट्या महत्वपूर्ण असलेल्या श्री क्षेत्र बाणेश्र्वर देवस्थान (पांडवकालीन गुफा मंदिर) ऊर्जा निर्माण करणारे स्थान असून याची ख्याती देशभरात पसरलेली आहे असे गणेश भुजबळ यांनी प्रास्ताविक करताना सांगीतले.

यावेळी बाणेर गाव प्रथम नगरसेवक ज्ञानेश्वर तापकीर, मा. स्थायी समितीचे चेअरमन बाबुराव चांदेरे, भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट चे सचिव डॉ. दिलीप मुरकुटे, भाजपा पुणे शहर उपाध्यक्ष गणेश कळमकर यांनी शुभेच्छा देत सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

श्री क्षेत्र बाणेश्र्वर देवस्थान ट्रस्ट ची स्थापना २००६ साली युवकांनी एकत्र येत केली होती. देवस्थान ट्रस्ट माध्यमातुन सर्वांच्या सहकार्यातून विकास काम करणार आहोत. सर्व बाणेर ग्रामस्थ पाठीशी भक्कम उभे राहतील अशी भावना आभार व्यक्त करताना ट्रस्ट चे अध्यक्ष संदिप वाडकर यांनी सांगितले.

यावेळी बाणेर गावातील सर्व पक्षीय नेते, सांप्रदायिक, क्रिडा क्षेत्रातील मान्यवर, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी ग्रामस्थ आणि युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.