पुणे :
ग्राहक रक्षक समिती राष्ट्रीय अध्यक्षा मा डॉ आशा पाटील यांच्या शिफारशीने व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष योगिता गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली साजना दिलीप भुजबळ यांची पुणे शहर प्रवक्ता महिला विभाग या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
साजना यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना पोचपावती देण्यात आली. सावित्री बचत गट आणि अहिल्या बचत गट च्या माध्यमातून अनेक उपक्रम राबविले आहे. विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या संस्था मार्फत आणि योजना मार्फत वस्तू स्वरूपात लाभ मिळवून दिला आहे. तसेच सामाजिक कार्यात दांडगा अनुभव असल्याने ग्राहक रक्षक समितीने दखल घेऊन हे पद देण्यात आले असून एक नवीन जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यावेळी अनेक स्तरातून शुभेच्छा चे वर्षाव होत आहे. तर ग्राहकांच्या हिताचे अधिक चांगले संरक्षण करण्यासाठी आणि त्या हेतूने ग्राहकांच्या विवादांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करेल असे साजना भुजबळ यांनी विचार मांडले. यावेळी सूत्रसंचालन भुजबळ यांनी केले.
सर्वसामान्य ग्राहकांच्या हितरक्षणासाठी व ग्राहकांची फसवणूक अथवा दिशाभूल करून करण्यात येणारी लूट थांबविण्यासाठी ग्राहक रक्षक समिती अतिशय समर्पक कार्य करत आहे. अशा या महत्वपूर्ण संघटनेत सिमा शिंदे यांचीपुणे शहर अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा मा योगिता गोसावी व महाराष्ट्र प्रदेश महासचिव शैलेंद्र निर्मळे यांच्या हस्ते पदनियुक्तीपत्र व ओळखपत्र देऊन नियुक्ती करण्यात आली आहे.
यावेळेस पिंपरी चिंचवड अध्यक्ष धर्मेंद्र तिवारी, पुणे जिल्हाध्यक्ष राहुल गुंड, संजीवनी बालगुडे, चेतना बिडवे, मिलन पवार, डॉ राजेंद्र भवाळकर, स्वप्नील तलाठी, श्याम पुणेकर इ मान्यवर उपस्थित होते.
More Stories
बालेवाडी येथे स्त्री फाउंडेशनकडून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांची सन्मान..
बालेवाडी येथे अमोल बालवडकर फाउंडेशन तर्फे हॅप्पी स्ट्रीट-2024 चे आयोजन…
श्री क्षेत्र बाणेश्वर देवस्थान बाणेर येथे महाशिवरात्र आणि वर्धापन दिन उत्साहात साजरा…