बालेवाडी :
अयोध्यातील श्री राम मंदिराच्या उद्घाटन आणि प्राणप्रतिष्ठेकरीता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार १४ ते २२ जानेवारी दरम्यान देशभर मंदिर व पुजास्थळांची स्वच्छता करण्याच्या अभियाना अंतर्गत लहू बालवडकर यांनी बालेवाडी परिसरात भैरवनाथ मंदिरात जाऊन साफ सफाई केली. याचसोबत बालेश्वर महादेव मंदिर, हनुमान मंदिर, सुवर्णमुखी दत्त मंदिर, संतोषी माता मंदिर, अष्टविनायक गणपती मंदिर या ठिकाणी देखील लहू बालवडकर व सहकार्यानी स्वच्छता केली. अजूनही मंदिराची स्वच्छता मोहिम सुरू असून येत्या काही दिवसात बालेवाडी परिसरातील सर्वच मंदिरात स्वच्छता करण्याचे ठरवले आहे.
“येत्या २२ जानेवारीच्या पार्श्वभूमीवर राम कार्याचा भाग होऊया देव्हाऱ्यातील देवावर अक्षता वाहुया, शुद्ध अंत:करणाने पुजा करून घरोघरी पणत्या लावून दिवाळी साजरी करूया,” असे आवाहन देखील यावेळी लहू बालवडकर यांनी नागरिकांना केले.
यावेळी लहू बालवडकर यांच्यासोबत वैशाली कमाजदार, योगेश बालवडकर, स्वप्निल टकले, राहुल केदारी, शामभाऊ बालवडकर, सुरज मांगडे, विनोद बालवडकर, रोहित बालवडकर, किरण खडांगळे, श्रीकांत नायकुडे, अजित बुरडे, पवन जोध,यांच्यासह मोठ्या प्रमाणात महिला व इतर सर्व ग्रामस्थांनी देखील स्वच्छता मोहिमेत सहभाग नोंदवला.
More Stories
बालेवाडी येथे स्त्री फाउंडेशनकडून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांची सन्मान..
बालेवाडी येथे अमोल बालवडकर फाउंडेशन तर्फे हॅप्पी स्ट्रीट-2024 चे आयोजन…
श्री क्षेत्र बाणेश्वर देवस्थान बाणेर येथे महाशिवरात्र आणि वर्धापन दिन उत्साहात साजरा…