November 21, 2024

Samrajya Ladha

बाणेर येथे श्री प्रभू रामलल्ला मूर्तीची प्राणप्रतिष्ठा निमित्त मंदिर स्वच्छ्ता अभियान सुरु, ज्योती कळमकर यांचा उपक्रम..

बाणेर :

बाणेर येथे माजी नगरसेविका ज्योती कळमकर आणि भाजपा पुणे शहर उपाध्यक्ष गणेश कळमकर यांनी आज अयोध्या येथे श्री प्रभू रामलल्ला मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोमवार दि.२२ जानेवारी २०२४ रोजी होणार आहे. यानिमित्त देशाचे लाडके पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांनी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत बाणेर परिसरातील मंदिरे स्वच्छ करायचे अभियानाचे नियोजन केले असून याची सुरूवात प्रभाग क्रमांक ९ मधील गणेश मंदिर स्वच्छ करून केली.

अनेक वर्षांनंतर आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान श्री प्रभू रामलल्ला मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोमवारी २२ जानेवारी रोजी होणार आहे. हि आपल्या सगळ्यांसाठीच आनंदाची अभिमानाची बाब आहे. देशाचे लाडके पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांनी देशवासि्यांना आव्हान करून या दिवशी देशात दिवाळी साजरी व्हावी असे आव्हान केले. आपल्या सर्वांसाठी हा एक दिव्य क्षण असून आपण तो मोठ्या उत्साहात साजरा करणार आहोत म्हणूनच बाणेर परिसरातील सर्व मंदिरे स्वच्छ करण्याचे अभियान सुरू करत असून परिसरातील ग्रामस्थ नागरिक सर्वपक्षीय सदस्य मंदिराचे ट्रस्टी या सर्वांनी या मोठ्या उत्साहात सहभागी होऊन हातभार लावण्यासाठी एकत्र येऊ : गणेश कळमकर (भाजपा पुणे शहर उपाध्यक्ष)

बाणेर परिसरातील मंदिर स्वच्छ्ता अभियान वेळापत्रक :
दि.१८ जानेवारी ते २० जानेवारी २०२४

दि.१८ जानेवारी २०२४ गुरुवार
१. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक बाणेर गाव सकाळी १०:०० वाजता.
२. हनुमान मंदिर बाणेर गाव सकाळी ११:०० वाजता
३. श्री भैरवनाथ मंदिर बाणेरगाव सकाळी ११:३० वाजता
४. श्री.बानेश्वर मंदिर दुपारी १२:०० वाजता

दिनांक १९ जानेवारी २०२४ शुक्रवार
१. सावता माळी मंदिर बाणेर गाव सकाळी १०:०० वाजता
२. देवी आई मंदिर बाणेर गाव सकाळी १०:३० वाजता
३. हरीजी बाबा मंदिर राम कदम चौक बाणेर सकाळी ११:०० वाजता
४. दत्त मंदिर आणि तुकाई माता मंदिर बाणेर गाव दुपारी १२:०० वाजता

दिनांक २० जानेवारी २०२४ शनिवार
१. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक डीपी रोड औंध सकाळी १०:०० वाजता
२. श्री दत्त मंदिर विधाते वस्ती सकाळी ११:०० वाजता
३. श्री गणेश मंदिर बालेवाडी फाटा सकाळी ११:३० वाजता
४. कोकणी बाबा मंदिर मोहन नगर बाणेर दुपारी १२:०० वाजता

सर्व पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, संघ परिवार, सर्व संघटनेचे कार्यकर्ते, सर्व गणेश मंडळाचे कार्यकर्ते, सर्व भजनी मंडळ यांनी सहभागी व्हावे.