May 29, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

औंध येथील जिजामाता चौक (परिहार) चौक येथील रखडलेल्या राजमाता जिजाऊ स्मारकात प्रशासनाचे लक्ष वेधत जिजाऊंची जयंती साजरी.

औंध :

राजमाता जिजाऊ यांच्या 425 व्या जयंती निमित्त आज औंध येथील जिजामाता चौक (परिहार) चौक येथील रखडलेल्या जिजामाता स्मारकात औंधगाव महिला भजनी मंडळाच्या हस्ते जिजाऊंचे पुजन करण्यात आले आणि सामुहिक शिववंदना घेण्यात आली.

 

या निमित्त या जिजाऊ स्मारकाकडे प्रशासनाचे लक्ष वेधावे आणि लवकरच हे स्फूर्तिदायक स्मारक पुर्ण व्हावे अशी इच्छा यावेळी आयोजक गणेश कलापुरे यांनी बोलून दाखवली.

शकुंतला पाटील या ज्येष्ठ मातेच्या हस्ते जिजाऊ पूजनाचा शुभारंभ केला आणि सर्व मातांच्या हस्ते पुजन करण्यात आले. यावेळी हेमंत पांचाळ, हरीश रुणवाल, रोहन रानवडे , निलेश कांबळे, सिद्धेश पाटील, अरुण पवार, सौ.उषा सातव जयश्री सोमवंशी शोभा गायकवाड , इंद्रायणी जुनवणे, सुरेखा वाडेकर, आरती शिर्के, जिजाबाई जुनवणे, सरला पुणतांबेकर, शकुंतला पाटील आदी उपस्थित होते.