May 17, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

औंधच्या क्षेत्रीय कार्यालयात अधिकारीच करतात विजेची चोरी, दोषींवर कारवाई करण्याची मनसेची मागणी..

औंध :

औंध क्षेत्रीय कार्यालयाच्या वाहनतळावर काही अधिकारी विना परवानगी इलेक्ट्रिकल दुचाकी वाहन चार्जिंग करतात याची तक्रार औंध क्षेत्रीय कार्यालय सहाय्यक आयुक्त गिरीश दापकेकर निवेदन देत कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना बाणेर बालेवाडी शाखेच्या वतीने करण्यात आली.

 

औंधच्या क्षेत्रीय कार्यालय मध्ये असणाऱ्या वाहनतळावर काही अधिकारीच विजेची चोरी करत इलेक्ट्रिकल दुचाकी वाहन कोणत्याही परवानगी शिवाय चार्जिंग करतात. ही गंभीर बाब असून दोषींवर कारवाई करावी आणि क्षेत्रीय कार्यालय वाहनतळ परिसरात चार चाकी प्रमाणे दुचाकी ई चार्जिंग स्टेशन उभारण्याची विनंतीही करण्यात आली.

यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शाखा अध्यक्ष श्री. अभिजीत चौगुले आणि श्री. किरण रायकर उपस्थित होते.