महाळूंगे :
भोर-राजगड-मुळशी मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार शंकर भाऊ मांडेकर हे महाळूंगे-सुस भागातील नागरिकांशी थेट संवाद साधणार आहेत. नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी रविवार, दिनांक १८ मे २०२५ रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत महाळूंगे येथील पुणे मनपा शाळेच्या सभागृहात भव्य जनता दरबार आयोजित करण्यात आला आहे.
या जनता दरबाराच्या माध्यमातून आमदार शंकर भाऊ मांडेकर नागरिकांच्या समस्या ऐकून घेणार आहेत आणि त्यावर योग्य तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार आहेत. त्यामुळे महाळूंगे-सुस भागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या जनता दरबारात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या जनता दरबाराचे निमंत्रण सौ. पूनमताई विशाल विधाते, कार्याध्यक्ष – पुणे शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेस आणि अध्यक्षा वामा वुमेन्स क्लब यांनी दिले आहे.


More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी