बाणेर :
शारीरिक दृष्ट्या महिला सक्षम करण्यासाठी राजमाता मासाहेब जिजाऊ जयंती आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीचे औचित्य साधून उद्या रविवार दिनांक 7 जानेवारीला पुणे शहरामध्ये प्रथमच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार अजित दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली तसेच पुणे महानगरपालिकेचे स्थायी समिती माझी अध्यक्ष मा. नगरसेवक बाबुराव चांदेरे यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो स्त्रियांच्या सहभागासह पुणे शहरात प्रथमच ‘उडान नारी शक्ती रन’ चे आयोजन पुनम विशाल विधाते यांच्या वतीने करण्यात आले आहे.
पुणे शहरात प्रथमच होणाऱ्या ‘उडान नारीशक्ती रन’ साठी महिलांना टी-शर्ट चे वाटप आज धनकुडे फार्म येथे करण्यात आले. महिलांमध्ये या रनमध्ये सहभागी होण्याकरता प्रचंड उत्साह दिसत असून उद्याचा रंग मध्ये सहभागी होण्याकरता मोठ्या उत्साहाने वाट पाहत आहेत.
महिलांनी शिक्षण, शक्ती व सन्मानाचा पुरस्कार केला पाहिजे. शिक्षण घेवून शक्ती वाढवावी व त्यातून समाजात सन्मानपूर्वक जीवन अंगिकारावे, हे आजच्या दिवसाचे महत्व आहे. महिला प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर असून ‘उडान नारीशक्ती रन’ माध्यमातुन हजारो महिला उद्या धावणार असून महिलांना आपण देखिल शारिरीक व मानसिक दृष्ट्या किती सक्षम आहोत हा आत्मविश्वास दाखविण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. उद्या होणाऱ्या रन मध्ये हजारो महिला भाग घेणार असून त्यांना प्रोत्साहन सर्वांनी आवर्जून उपस्थित रहात महिलांचा उत्साह वाढवावा : पूनम विशाल विधाते (सामाजिक कार्यकर्त्या)
‘उडान नारी शक्ती’ रनचे प्रमुख आकर्षण सिनेअभिनेत्री प्राजक्ता गायकवाड,मा. कु. आदिती ताई तटकरे महिला व बालविकास मंत्री त्याचबरोबर मावळचे आमदार सुनील अण्णा शेळके, वडगावशेरी चे आमदार सुनील अण्णा टिंगरे, IPS अधिकारी कृष्णप्रकाश, दीपक भाऊ मानकर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर, श्री सुनील चांदेरे उपाध्यक्ष पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक. या प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये ‘उडान नारी शक्ति’ रनला हिरवा झेंडा दाखवला जाईल.
More Stories
बालेवाडी येथे स्त्री फाउंडेशनकडून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांची सन्मान..
बालेवाडी येथे अमोल बालवडकर फाउंडेशन तर्फे हॅप्पी स्ट्रीट-2024 चे आयोजन…
श्री क्षेत्र बाणेश्वर देवस्थान बाणेर येथे महाशिवरात्र आणि वर्धापन दिन उत्साहात साजरा…