बाणेर :
स्वराज्य निर्मात्या आऊसाहेब जिजाऊ आणि शिक्षणाची ज्योत घरोघरी पोहोचवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त पुणे मनपा स्थायी समितीचे माजी अध्यक्ष नगरसेवक बाबुराव आप्पा चांदेरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पुनम विशाल विधाते फाउंडेशन च्या वतीने आयोजित पुण्यातील पहिल्या नारी शक्ती रन साठी महिलांचा रेकॉर्ड ब्रेक प्रतिसाद लाभला.
पुण्यातील पहिल्या नारीशक्ती रनचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे, बारामती टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार, यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी सिने अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड उपस्थित होत्या. प्राजक्ता ताईंच्या भाषणांनी उपस्थितांची मन जिंकली.
या कार्यक्रमाच्या वेळी अनेक प्रमुखांनी उपस्थिती दर्शवली यामध्ये केड्राई पुणे शहर अध्यक्ष रणजीत नाईकनवरे, आर्किटेक्ट गौरी नाईकनवरे, राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर उपाध्यक्ष राहुल दादा बालवडकर, दत्तात्रय कळमकर, डॉ. राजेश देशपांडे, नितीन कळमकर, अर्जुन शिंदे, विजय विधाते, राजेश विधाते, रामदास विधाते, युवराज कोळेकर, समीर कोळेकर, पांडुरंग पाडळ, शरद विधाते, अर्जुन ननवरे, रामदास धनकुडे, सुदीप पाडळे, शेखर सायकर, निखिल धनकुडे, संजय ताम्हणे, राजश्री आठरे, छत्रपती पुरस्कार विजेते सुनिता कडलग, एव्हरेस्ट वीर कडलग मॅडम, प्रतीक्षा मुरकुटे, राष्ट्रीय खेळाडू दिपाली निमन आदी उपस्थित होते.
पुण्यामध्ये प्रथमच बाणेर येथे उडान नारी शक्ती रन संपन्न झाले. बारामती टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी स्त्रियांसाठी आयोजित करण्यात आलेल्या उपक्रमाचे तोंड भरून कौतुक केले.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन पाहून सर्वांनीच असे उपक्रम दरवर्षी आयोजित करण्याचा आग्रह केला.तसेच महिला वर्गाने दिलेला प्रतिसाद आणि पाठीवर टाकलेले कौतुकाची थाप मला पुढील काळात नक्कीच प्रेरणादायक ठरेल.
More Stories
बालेवाडी येथे स्त्री फाउंडेशनकडून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांची सन्मान..
बालेवाडी येथे अमोल बालवडकर फाउंडेशन तर्फे हॅप्पी स्ट्रीट-2024 चे आयोजन…
श्री क्षेत्र बाणेश्वर देवस्थान बाणेर येथे महाशिवरात्र आणि वर्धापन दिन उत्साहात साजरा…