November 21, 2024

Samrajya Ladha

बालेवाडी येथे उद्या भाविकांना मिळणार ‘चैतन्य स्पर्श’ सोहळ्याचा अद्भुत ठेवा.

बालेवाडी :

बालेवाडी येथील भाजपा पुणे शहर चिटणीस लहु गजानन बालवडकर यांच्या वाढदिवसानिमित्त लहु बालवडकर सोशल वेलफेअर आयोजित ‘चैतन्यस्पर्श’ भारतातली १२ शक्तिपीठांच्या पादुकादर्शनाचा अभूतपूर्व सोहळा उद्या शनिवार दिनांक ६/१/२०२४ रोजी स्थळ: कम्फर्ट झोन सोसायटी समोर, बालेवाडी, पुणे – ४५ येथे होणार आहे.

गेली अनेक वर्षापासून लहू बालवडकर यांच्या माध्यमातुन परिसरातील भाविकांना ‘चैतन्य स्पर्श’ घडविण्याचे धार्मिक कार्य घडत आहे. मागील वर्षी जवळपास सतरा हजार भाविकांनी दर्शन आणि महाप्रसादाचा लाभ घेतला. गेली अनेक वर्ष समाज सेवेतून वेगवेगळे लोकोपयोगी उपक्रम राबवित असताना परिसराचे सांप्रदायिक महत्व लक्षात घेऊन ‘चैतन्य स्पर्श’भारतातली १२ शक्तिपीठांच्या पादुकादर्शनाचा अभूतपूर्व सोहळा भरवला जात आहे.

या वर्षीचा सोहळा अधिक अद्वितीय असणार आहे. या सोहळ्यात श्रीराम जन्मभूमी मंदिर अयोध्या, लोकार्पण सोहळ्यानिमित्त २१००० दिव्यांची आरास, महिला व पुरुष सामूहिक रामरक्षा पठण आणि ५१ तबला व पखवाज वादकांची जुगलबंदी त्याचबरोबर महिला व पुरुष भव्य भजन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे त्याची महा अंतीम फेरी होणार आहे. तसेच यावेळी हभप सोपान महाराज कनेरकर यांचे व्याख्यान होणार आहे.

या सोहळ्यानिमित्त राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा अध्यत्मिक क्षेत्रातील विविध मान्यवर आवर्जून उपस्थिती लावणार आहेत. भाविकांनी ‘चैतन्य स्पर्श’ सोहळ्याचा लाभ घेण्यासाठी सोहळ्यात सहभागी व्हावे असे आव्हान लहू बालवडकर यांनी सर्वांना केले आहे.