August 28, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

गणेशखिंड येथील माॅडर्न महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी केले जेष्ठांच्या सहवासात नव वर्षाचे स्वागत…

गणेशखिंड :

गणेशखिंड येथील माॅडर्न महाविद्यालयातील फ्युचर बॅकर्स फोरम व जाणिव यांनी धनकवडी येथील श्रीराम योगसाधना, धनकवडी व लायन्स क्लब, कात्रज यांच्या सहयोगाने ‘स्वागत करुया नविन वर्षाचे’ हा कार्यक्रम दरवर्षी प्रमाणे जेष्ठांच्या सहवासात साजरा केला.

 

या प्रसंगी विद्यार्थ्यांनी कविता वाचन, पोवाडा, नृत्य, गायन यासारखे विविध सांस्कृतीक कार्यक्रम सादर केले. या प्रसंगी डाॅ मनीषा बेले यांनी सादर केलेल्या मंगळागौर उखाणे याचे सगळ्यांनी खुप कौतुक केले. विद्यार्थी व जेष्ठ यांची अंताक्षरी खुप रंगली. जेष्ठांनी जुनी व विद्यार्थ्यांनी नवी हिंदी गाणी सादर करुन धमाल केली आणि आजी आजोबांनी नातवंडा बरोबर धमाल नृत्य केले. आजी आजोबांविषयी बोलताना सगळ्यांचे डोळे पाणावले. त्यांचा अर्शिवाद घेऊन हा कार्यक्रम संपला. या प्रसंगी कु आर्या भागवत हिचा अँथलॅटिक्स मधील सुवर्ण पदकासाठी सत्कार करण्यात आला.

ऋषी याने सांता बनून व प्रशांत व श्रध्दा यांनी सुत्रसंचलन करुन कार्यक्रमात बहार आणली. श्री भानुदास पायगुडे, आध्यक्ष लायन्स क्लब,कात्रज, सौ आरती ठोंबरे, आध्यक्ष, श्रीराम योगासाधना यांनी सहकार्य केले.

प्रा. विजयालक्ष्मी कुलकर्णी यांनी आयोजन केले तर कार्यक्रमाचे नियोजन डाॅ. मंजुषा कुलकर्णी यांनी केले.
कार्यक्रमासाठी डाॅ पल्लवी निखारे व अँड अदिती पिंपळे यांनी मदत केली . उपप्राचार्य डाॅ. शुभांगी जोशी यांनी कार्यक्रमासाठी मार्गदर्शन केले. प्राचार्य डाॅ. संजय खरात यांनी सर्वांचे कौतुक केले.

या प्रसंगी धनकवडी विभागाच्या नगरसेविका सौ अश्विनी भागवत विशेष उपस्थित होत्या. या प्रसंगी त्या म्हणाल्या, “ आर्याच्या कौतुकाने मी भाराऊन गेले आहे. माॅडर्न महाविद्यालयाचा हा आजी आजोबांच्या बरोबरचा हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे.”

कार्यक्रमासाठी पी ई सोसायटीचे सहकार्यवाह प्रा सुरेश तोडकर व उपकार्यवाह डाॅ प्रकाश दिक्षित यांनी खुप प्रशंसा केली.

 

You may have missed