September 8, 2024

Samrajya Ladha

नागरीकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने धोकादायक अवैध पद्धतीने घरगुती गॅस सिलेंडर वापरणाऱ्यावर कार्यवाही करावी, सनी निम्हण यांची महापालिका आयुक्तांना पत्राद्वारे मागणी..

पुणे :

माजी नगरसेवक सनी निम्हण यांनी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त श्री. विक्रम कुमार यांना पत्र पाठवत नुकतीच पुण्यातील विमाननगर भागातील अवैध पद्धतीने जमवलेल्या 10 सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली. पुणे शहरात सातत्याने अशा घटना घडत आहेत. अशा घटनांमुळे पुणे शहरातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यासाठी पुणे महानगरपालिकेने कडक कार्यवाही करण्याची भूमिका घ्यावी व क्षेत्रीय कार्यालयांच्या अंतर्गत येणाऱ्या अश्या ठिकाणी निरीक्षक पाठवून लक्ष ठेवण्याची मागणी केली आहे.

 

या पत्रात सनी निम्हण यांनी म्हंटले आहे की, पुणे शहरात यापूर्वी देखील अशा घटना घडल्या आहेत. त्यामुळे या संदर्भात आवश्यक उपाययोजना करण्याची गरज असून, अवैध पद्धतीने होणारी गॅस सिलेंडरची खरेदी विक्री, सिलेंडरचा अवैध पद्धतीने साठा करणे, असुरक्षित पद्धतीने सिलेंडरची वाहतूक व हाताळणी तसेच व्यावसायिक कारणासाठी होणारा घरगुती सिलेंडरचा सरास वापर, वाहनांमध्ये अवैध पद्धतीने घरगुती वापराचा गॅस वापरणे आणि अनेक छोटे हॉटेल व्यवसायिक तर रस्त्यावर भर गर्दीमध्ये अशा प्रकारे असुरक्षित पद्धतीने घरगुती गॅसचा इंधन म्हणून वापर करतात.

या सर्व प्रकारामुळे सर्वसामान्य जनतेसोबतच या व्यावसायिक बांधवांची सुरक्षा देखील धोक्यात आलेली दिसते. त्यामुळे या सर्व प्रकारांना आळा घालण्यासाठी तातडीने आवश्यक त्या उपाययोजना करणे गरजेचे आहे. म्हणून पुणे महानगरपालिका प्रशासनाने यासंदर्भात जनजागृती बरोबर आवश्यक त्या ठिकाणी कारवाई करण्याची मोहीम राबवावी. तसेच या मोहिमेत पुणे शहरातील लोकप्रतिनिधी आणि गॅस एजन्सी यांची देखील सहकार्य घ्यावे, अशी मागणी माजी नगरसेवक सनी निम्हण यांनी पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रमकुमार यांना पत्र पाठवित केली आहे.