September 23, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

महाळुंगे परिसरातील समस्या सोडविण्यासाठी सोसायट्यांनी घेतली औंध क्षेत्रिय कार्यालय सहाय्यक आयुक्त दापकेकर यांची भेट…

औंध :

आज गुरुवार, दिनांक 21 डिसेंबर 2023 रोजी शितळादेवीनगर असोसिएशन, महाळुंगे मधील रॉयल सिरीन सोसायटी, इक्विलाइफ होम्स सोसायटी आणि स्काय बे सोसायटी मधील सभासदयांच्यामार्फत औंध क्षेत्रिय कार्यालय सहाय्यक आयुक्त गिरीश दापकेकर साहेब यांना भेटून शितळादेवीनगर महाळुंगे परिसरातील असलेल्या सांडपाणी, कचरा, सफाई, अतिक्रमण, मोकाट डुक्कर यांसारख्या अनेक समस्यांबाबत चर्चा केली.

 

सहाय्यक आयुक्त श्री गिरीश दापकेकर साहेबांनी पुढील काही दिवसांनी त्यांच्या विभागीय अधिकारी यांच्यासोबत सदर परिसरात भेट देणार असल्याचे त्यांनी कळवले आहे.

सदर प्रसंगी श्री. स्वानंद धोंडसे, श्री. हितेश माने, श्री. आकाश खापरे ( रॉयल सिरीन सोसायटी) श्री. विठ्ठल पडवळ, श्री. आदित्य खाडे, श्री.अभिजीत चौगुले (इक्विलाइफ होम्स सोसायटी) आणि श्री. संतोष गायकवाड ( स्काय बे सोसायटी ) आदी सभासद उपस्थित होते.