शिवाजीनगर :
प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न इंग्रजी माध्यम हायस्कूल, छत्रपती शिवाजीनगर, पुणे 5 या शाळेत आज सोमवार दिनांक 18 डिसेंबर 2023 रोजी शाळेच्या मैदानावर वार्षिक क्रीडा बक्षीस समारंभ मोठ्या जल्लोषात साजरा झाला.
‘ऑल डिफेन्स सर्विसेस फिजिकल फिटनेस ट्रेनिंग सेंटर’ संस्थापक, संचालक, कोच, ‘जम्पिंग गोरिला मॅरेथॉन 120 कि.मी. धावणे – चौथा क्रमांक प्राप्त ,(एस. आर. टी ) सिंहगड, राजगड, तोरणागड, अल्ट्रा मॅरेथॉन २०२२ (५३ किलोमीटर धावणे) टॉप टेन मध्ये अशी विशेष ओळख असलेले माननीय मंगेश भालेराव सर पाहुणे म्हणून लाभले.
कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय माधुरी शहा यांनी पाहुण्यांचे स्वागत करून केले. मैदानावर उपस्थित पालक – शिक्षक संघाचे पालक, शिक्षक, इयत्ता पाचवी ते दहावीचे विद्यार्थी-विद्यार्थिनी यांच्या उपस्थितीत मैदानावर सोहळ्याच्या सुरुवातीलाच, ‘रिले’ आणि ‘बॉक्स क्रिकेट मॅच’ हे दोन्ही खेळ रंगले. तसेच वर्षभरातील शालेय स्तरावर संपन्न झालेल्या सांघिक आणि वैयक्तिक स्पर्धांच्या निकालावर आधारित शाळेतील ‘उत्तम विद्यार्थी खेळाडू शौर्य खेंगरे’ आणि ‘उत्तम विद्यार्थिनी खेळाडू स्वराली जाधव’ आणि विविध स्पर्धेतील विजेत्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षीसे देण्यात आली. तसेच शाळेतील आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्यस्तरीय स्तरावरील खेळाडूंचा देखील सत्कार करण्यात आला.
प्रमुख पाहुणे माननीय मंगेश भालेराव सरांनी आपल्या भाषणातून नियमित सराव, शांतता, संयम अशा त्रिसूत्रींचा कानमंत्र उपस्थित विद्यार्थ्यांना दिला. त्यांनी विद्यार्थ्यांना आपल्या भाषणातून प्रोत्साहन दिले. शालेय स्तरावरच विविध खेळांमध्ये सहभागी व्हा, प्रामाणिकपणे, कष्टाने सराव करत राहा, रोज नियमित सराव अत्यंत आवश्यक आहे, जो आपल्याला पुढे यशाकडे नेतो. खेळांमुळेच आपल्याला जीवनात सन्मान, प्रतिष्ठा मिळते.
कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न होण्यामागे प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष मा. डॉ. गजानन एकबोटे सर यांचे विशेष प्रोत्साहन लाभले. तसेच संस्थेच्या सहकार्यवाह मा. प्रा. डॉ. ज्योत्स्ना एकबोटे मॅडम, संस्थेचे सेक्रेटरी मा. शामकांत देशमुख सर तसेच शाळेचे व्हिजिटर मा. प्रा. डॉ. प्रकाश दीक्षित सर, मुख्याध्यापिका सौ. माधुरी शहा यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले. शाळेचे क्रीडा शिक्षक ऋषिकेश दीक्षित आणि स्मिता गांगुर्डे यांच्या उत्तम नियोजनामुळे सोहळा यशस्वीपणे संपन्न झाला.
More Stories
गणेशखिंड येथील मॉडर्न महाविद्यालयात मानसशास्ञाचा ‘कॅलिडोस्कोप १६’ अंकाचे प्रकाशन
औंध येथील अमोल दत्तात्रय टेंबरे यांना भारत भूषण पुरस्कार प्रदान…
ग्राफिटीच्या हौशी कलाकारांचे चित्र प्रदर्शन संपन्न…