April 15, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

पुणे जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सुहास भोते यांनी नागरिकांसाठी तयार केलेल्या ‘दिनदर्शिका 202४’ चे प्रकाशन आमदार संग्राम थोपटे यांच्या शुभहस्ते संपन्न..

सुसगाव :

सुसगाव आणि मुळशी तालुक्यातील नागरिकांना नूतन वर्षातील सण-वार, मुहूर्त, यात्रा-उत्सव आणि जयंती-पुण्यतिथी यासंदर्भातील इत्यंभूत माहिती सहज उपलब्ध व्हावी म्हणून पुणे जिल्हा युवक काँग्रेस उपाध्यक्ष सुहास भोते यांनी नागरिकांसाठी तयार केलेल्या ‘दिनदर्शिका 202४’ चे प्रकाशन कार्यसम्राट आमदार संग्राम थोपटे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

 

आपल्या जीवनामध्ये दिनदर्शिकेला एक वेगळे महत्त्व आहे. दिनदर्शिका ही जीवनामध्ये अविभाज्य भाग असून आपल्या दिवसाची सुरुवात त्यापासून होते. सन – सनावळ, तिथी, वार आणि इतर सर्व उपयोगी माहिती या दिनदर्शिकेत उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे. परिसरातील जास्तीत जास्त नागरिकापर्यंत ही दिनदर्शिका पोचविणार आहे : सुहास भोते(पुणे जिल्हा युवक काँग्रेस) उपाध्यक्ष

सुहास भोते यांनी आपल्या परिसरामध्ये सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी कार्यात नेहमीच पुढाकार घेतला आहे. घरामध्ये आवश्यक असणाऱ्या दिनदर्शिका सर्वांसाठी उपलब्ध करून देण्याचे चांगले काम त्यांच्याकडून होत आहे : आमदार संग्राम थोपटे 

यावेळी मुळशी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष गंगाराम मातेरे, मा.नगरसेवक ज्ञानेश्वर तापकीर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दादाराम मांडेकर,चांदे गावचे मा. उपसरपंच प्रासाद खानेकर, युवराजतात्या चांदेरे, एकनाथ खानेकर, प्रतिक साखरे उपस्थित होते.