बालेवाडी :
भाजपा पुणे शहर चिटणीस लहू गजानन बालवडकर यांच्या वाढदिवसानिमित्त लहू बालवडकर सोशल वेलफेअरच्या वतीने बालेवाडी, बाणेर, औंध, सुस, महाळूंगे, पाषाण, सुतारवाडी आणि सोमेश्वरवाडी परिसरात सलग दुसऱ्या वर्षी भव्य महिला व पुरूष भव्य भजन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. ३,४,५ जानेवारी रोजी स्पर्धेची प्राथमिक फेरी होणार असून अंतिम फेरी आणि बक्षीस वितरण सोहळा ६ जानेवारी २०२४ रोजी संपन्न होणार आहे.
भाजपा पुणे शहर चिटणीस लहू बालवडकर यांचा वाढदिवस सांप्रदायिक क्षेत्रांत भजनी मंडळांना चालना मिळावी या उद्देशाने लहू बालवडकर सोशल वेलफेअरच्या वतीने गेल्या वर्षी प्रमाणे भव्य व आगळी वेगळी स्पर्धा आयोजित केली आहे. परिसरातील जवळ पास १०० पेक्षा जास्त भजनी मंडळे या स्पर्धेत सहभागी होतात. यामधे सोसायटी मधील देखिल भजनी मंडळे भाग घेत असतात
भाजपा पुणे शहर चिटणीस लहू बालवडकर यांनी स्पर्धेची माहिती देताना सांगित ले की, परिसरातील नागरिकांची सेवा विविध उपक्रमातून करत असताना आपला वाढदिवस गेल्या वर्षी पासुन सांप्रदायिक क्षेत्रातील नागरीकांसाठी भजन स्पर्धा आयोजित करून साजरा करणार आहे. आपल्या परीसरात भजनी मंडळे मोठया प्रमाणात असून त्यांना चालना मिळावी उत्साह वाढावा व हक्काचे व्यासपीठ मिळावे या हेतुने नियोजनबद्ध पणे भव्य स्वरूपात आगळी – वेगळी भजन स्पर्धा पुरुष आणि महिलांसाठी आयोजित केली आहे. परिसरातील विविध भजनी मंडळ सोबतच सोसायटी मध्ये देखिल भजनी मंडळ या स्पर्धेसाठी सज्ज झाली आहेत.
स्पर्धेची बक्षिसे आणि स्वरूप :
पहिले बक्षिस – ५१००० रूपये आणि सन्मानचिन्ह
दुसरे बक्षिस – ४१००० रूपये आणि सन्मानचिन्ह
तिसरे बक्षिस – ३१००० रूपये आणि सन्मानचिन्ह
चौथे बक्षिस – २१००० रूपये आणि सन्मानचिन्ह
पाचवे बक्षिस – ११००० रूपये आणि सन्मानचिन्ह
वैयक्तिक बक्षिसे :
उत्कृष्ट गायन – ७५०० रुपये आणि सन्मानचिन्ह
उत्कृष्ट मृदंगवादन – ७५०० रुपये आणि सन्मानचिन्ह
उत्कृष्ट हार्मोनियम – ७५०० रुपये आणि सन्मानचिन्ह
सहभागी होणाऱ्या प्रत्येक भजनी मंडळास प्रवास खर्च आणि भोजन व्यवस्था केली जाणार आहे.
स्पर्धेचे स्वरुप :
३/४/५ जानेवारी रोजी प्राथमिक फेरी होईल
स्थळ – विठ्ठल रुक्मिणी मंदिर बालेवाडी .
महा अंतिम फेरी ६ जानेवारी रोजी
स्थळ : सर्व्हे नंबर १९/१/१ बाणेर – बालेवाडी रोड, कम्फर्ट झोन सोसायटी समोर, बालेवाडी पुणे – ४५
संपर्क : ८३८०९९००७७/९३७१९९००७७
More Stories
बालेवाडी येथे स्त्री फाउंडेशनकडून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांची सन्मान..
बालेवाडी येथे अमोल बालवडकर फाउंडेशन तर्फे हॅप्पी स्ट्रीट-2024 चे आयोजन…
श्री क्षेत्र बाणेश्वर देवस्थान बाणेर येथे महाशिवरात्र आणि वर्धापन दिन उत्साहात साजरा…