May 19, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बालेवाडी येथे उद्या रंगणार श्री. अलंकापुरी पंचक्रोशी प्रदक्षिणा सोहळा…

बालेवाडी :

सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील ह भ प ज्ञानेश्वर माऊली महाराज कदम (छोटे) यांच्या प्रेरणेने शनिवार दिनांक 30 डिसेंबर २०२३ रोजी बालेवाडी येथे श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान ट्रस्ट बालेवाडी चे अध्यक्ष संजय बालवडकर व माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या वतीने श्री. अलंकापुरी पंचक्रोशी प्रदक्षिणा सोहळा – २०२३ चे आयोजन करण्यात आले आहे.

 

यावेळी आयोद्या येथून अभिमंत्रित होऊन आलेला मंगल अक्षता कलश आणि श्री.संत ज्ञानेश्र्वर महाराज पादुकांचे पूजन होणार असून पालखी सोहळा देखिल होणार आहे. सर्व कार्यक्रम वेळेत होणार असून प्रदक्षिणा सोहळ्या नंतर अक्षता कलश दर्शनासाठी दिवसभर उपलब्ध असणार आहे. भाविकांनी याचा लाभ घेण्यासाठी कार्यक्रमात सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी : अमोल बालवडकर ( माजी नगरसेवक)

कार्यक्रमाचे ठिकाण : सर्व्हे नं. ५१, विठ्ठल मळा(गो-शाळा) पार्क लँड सोसायटी जवळ, बालेवाडी, पुणे.

पालखी प्रस्थान : सावतामाळी मंदिर- सकाळी ७:३० वा. विठ्ठल मळा सकाळी ८:०० वा.

पालखी मार्ग : सावतामाळी मंदिर – बालेवाडी फाटा -लक्ष्मी माता मंदिर – विठ्ठल मंदिर – विठ्ठल मळा