June 1, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बाणेर येथिल यूतिका सोसायटी मध्ये अयोध्यातून आलेल्या मंगल अक्षता कलशाचे भव्य स्वागत..

बाणेर :

बाणेर येथिल यूतिका सोसायटी मध्ये अयोध्यातून आलेल्या मंगल अक्षता कलशाचे रविवार दिनांक २४/१२/२०२३ रोजी स्वागत शोभ यात्रा काढत संपन्न झाली. सोसायटीत जवळपास तीनशे लोकांनी दर्शन घेत कलश पूजन केले.

यावेळी भव्य स्वरूपात डोल ताशांच्या निनादात सोसायटी मध्ये मिरवणूक काढण्यात आली. ज्यामध्ये सोसायटी मधील महिलांसह सर्वच जणांनी मोठया उत्साहात सहभाग घेतला. श्रीरामाच्या जयघोषात भगवा ध्वज उंचावत हि यात्रा संपन्न झाली.

युतिका सोसायटी मध्ये अक्षता कलशाची मनोभावे पूजा करण्यात आली. यावेळी राम स्तुति आणि आरती घेण्यात आली. तसेच राम रक्षा श्रोत वाचन करण्यात आले.

यावेळी रामकुमार मौर्य, आनंद देवस्थले, केदार साबने, किरण चांदेरे, दीपक सिंह, अरविंद वलसंगकर, मंदार राविकर, सचिन कळमकर, अभिजीत नरगुंडे आणि युतिका रहवासी मोठया प्रमाणात उपस्थित होते.

You may have missed