May 13, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

योगीराज पतसंस्थेच्या नूतन वर्षाच्या कैलेंडरचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन ….

बाणेर :

योगीराज सहकारी पतसंस्था बाणेर चे नूतन वर्षाचे कैलेंडरचे प्रकाशन संस्थेच्या कार्यालयात विवीध क्षेत्रांतील मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. सदर प्रसंगी सभासदांना 25 लाख रुपयांचे कर्ज वितरीत करण्यात आले. तसेच भाजपा चे पुणे शहर उपाध्यक्ष गणेश कळमकर व संस्थेचे वसुली अधिकारी संदीप जाधव यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

 

याप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर तापकीर यांनी याप्रसंगी सांगितले की, संस्था प्रत्येक वर्षी कैलेंडरवर चित्रांच्या माध्यमातून समाजासाठी प्रेरणा व माहिती देण्याचा प्रयत्न करत असते. यावर्षी प्रत्येक महिन्यात “महाराष्ट्राची लोककला” ची चित्रे घेण्यात आले आहेत. जेणेकरून आजच्या पिढीला महाराष्ट्रातील लोककला माहिती व्हावी व लोप पावत चाललेल्या लोककलेला पुढील काळात त्याचे जतन व्हावे हा यामागील हेतू आहे. संस्थेच्या आर्थिक प्रगती व सामाजिक कार्याची माहिती यावेळी दिली.

यावेळी माजी महापौर दत्तात्रय गायकवाड, माजी नगरसेवक तानाजी निम्हण, अमोल बालवडकर, भाजपा चे गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर, प्रकाश बालवडकर, लहु बालवडकर, प्रविण शिंदे, अभिनव शिक्षण संस्थेचे अशोक मुरकुटे, वसंत जुनवने, डॉ. रियाज मुल्ला, अनिल सुर्यवंशी, संस्थेचे शाखाध्यक्ष राजेंद्र मुरकुटे, संचालक गणेश तापकीर, माजी संचालक अशोक रानवडे, वसंत माळी, मुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय गंगणे, तसेच संस्थेचा सर्व स्टाफ व खातेदार उपस्थित होते.

आलेल्या सर्वांचे स्वागत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर तापकीर यांनी केले तर सर्वांचे आभार उपाध्यक्ष राजेश विधाते यांनी मानले.