May 30, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बाणेर, बालेवाडी, सूस, महाळूंगे येथिल नागरिकांसाठी डॉ. दिलीप मुरकुटे यांनी बनविलेल्या ‘दिनदर्शिका-२०२४’ चा प्रकाशन सोहळा संपन्न..

बाणेर :

डॉ.दिलीप मुरकुटे पाटील यांच्या वतीने बाणेर, बालेवाडी, सूस, महाळूंगे येथिल नागरिकांसाठी बनविलेल्या ‘दिनदर्शिका-२०२४’ चा प्रकाशन सोहळा माजी नगरसेवक अमोल बालवडकर, पिरगुंट शाखा अध्यक्ष राम गायकवाड, यांच्या हस्ते संपन्न झाला

 

दैनंदिन जीवनात दिनदर्शिकेचे महत्व लक्षात घेता परिसरातील नागरिकांना दिनदर्शिका उपलब्ध करून देत आहे. या दिनदर्शिकेमध्ये दररोज च्या जीवनात आवश्यक सर्व माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे : डॉ. दिलीप मुरकुटे पाटील(संस्थापक बाणेर नागरी पतसंस्था/सचिव भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट बाणेर)

या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते रखमाजी पाडाळे, किरण मुरकुटे, संतोष भोसले, शिवाजी गव्हाणे, प्रदीप सोनवणे, विनोद चित्ते, मोहन उपासे, सुरेश कांबळे, चांगदेव घुमरे, शंकर जाधव, बालाजी पन्हाळकर, हनुमंत सोनवणे,सुरेश मोरे, नागेश घाडगे, दादासाहेब अवसरे आदी मान्यवर उपस्थित होते.