October 9, 2024

Samrajya Ladha

कबड्डी खेळाडूंनी १८० किलोमिटर सायकल चालवत दिला पर्यावरण वाचवण्याचा संदेश

पुणे :

अभिजीतदादा कदम मित्र मंडळ व प्रतिष्ठान आयोजित डॉ. पतंगराव कदम साहेब यांच्या ८ जानेवारी २०२४ जयंतीनिमित्त कर्मभूमी पुणे ते जन्मभूमी सांगली आसा सायकल प्रवास करून सायकल चालवा पर्यावरण वाचवा हा संदेश अँड. रामचंद्र ऊर्फ चंदूशेठ कदम यांच्या मार्गदर्शनाखाली समाजात पोहचवण्यासाठी मोहीम आखण्यात आली आहे. याचा भाग म्हणून पुणे ते सातारा व सातारा ते पुणे असा १८० किलोमीटरचा खडतर सायकल प्रवास महिला कबड्डी खेळाडू खेळाडूंनी पार केला.

यामधे कु. सानिका खाडे, कु. स्नेहल गोपाळघरे, कु. श्रावणी मासुगडे, कु. तृप्ती डिंगनकर, कु. श्रेया दिवाळे, कु. मानसी गोरखे, कु. आर्या लव्हार्डे, कु. रिया लव्हार्डे, कु. आलिया सय्यद, कु. श्रुतिका भामे, कु. पूनम बामगुडे, कु. अंजली आंग्रे, कु. समीक्षा गुरव, कु. भक्ती चाकणकर, कु. रोशनी कोंढाळकर , कु. पायल फरगडे, कु. अनुष्का केमसे, कु. अनुष्का शिर्के,कु. तेजस्विनी सोनार, कु. गार्गी कानगुडे, कु.श्रीकांत बाबाने, कु. श्रेयस खळदकर व कु. अभिजीत अबुज यांनी हा टप्पा यशस्वीपणे पार केला

प्रवास करून सायकल चालवा पर्यावरण वाचवा ही चळवळ समाजातील प्रत्येक घटकाने अंमलात आणली पाहिजे हा खरा हेतू या सायकल प्रवसाचा आहे. या महिला खेळाडूंची साताऱ्यात निवासाची व भोजनाची व्यवस्था कोथरूड प्रहार अपंग क्रांती मोर्चाच्या अध्यक्ष सुनंदा बामणे यांनी केली. साताऱ्या वरुन पुण्याकडे येत असताना मातोश्री भेळचे संचालक संतोष उभे यांनी जेवणाची व्यवस्था केली. या सायकल प्रवासाचे मार्गदर्शन लोकश्री क्रीडा ज्ञानपीठाचे उपाध्यक्ष श्री सुरेश राऊत, कबड्डी प्रशिक्षक श्री. अजय हुलावळे व राष्ट्रीय विद्यापीठ खेळाडू श्री योगेश लुगडे यांनी केले.

You may have missed