September 17, 2024

Samrajya Ladha

बावधनच्या पेरिविंकलच्या विद्यार्थ्यांनी विणले “दोन धागे रामासाठी”

पुणे :

अयोध्येतील श्री राम मंदिराचे बांधकाम पूर्णत्वाकडे असून लवकरच मंदिरात रामलल्ला विराजमान होणार आहेत. यानिमित्ताने देशातभरात आतापासूनच विविध ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. जन्मभूमी मंदिरातील श्रीरामाच्या मूर्तीसाठी वस्त्र विणण्याचा “दोन धागे श्रीराम के लिये”….!हा अविष्कार पुण्यात सौदामिनी हॅण्डलूमतर्फे साकारला जात आहे. या कार्यक्रमात पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल, बावधनच्या विद्यार्थ्यांनी आपले योगदान दिले.

या चळवळीमुळे मुलांच्या मनात भारतीय संस्कृतीचा जाज्वल्य इतिहास जोपासण्यात आला. अयोध्या येथील श्रीराम मंदिरातील भगवान रामचे वस्त्र विणण्याचे भाग्य पेरीविंकल स्कूलला मिळाले आणि या पवित्र कामास शाळेचा हातभार लागला याचा प्रचंड आनंद होत आहे असे मत शाळेचे अध्यक्ष व संस्थापक माननीय श्री.राजेंद्र बांदल सर यांनी व्यक्त केले.

या उपक्रमातून मुलांच्या हस्तकलेस प्रोत्साहन देण्यात आले. भगवान रामांसाठी वस्त्र विणुन पेरिविंकलच्या विद्यार्थ्यांनीही या उपक्रमात खारीचा वाटा उचलला. श्रीराम मंदिराच्या कामात आपला देखील हातभार लागावा या अनुषंगाने शाळेतील विद्यार्थ्यांसाठी श्रीरामांच्या मूर्तीसाठी वस्त्र विणण्याची संधी प्राप्त करून सांस्कृतिक ठेवा जपण्यात पेरिविंकल स्कूलला पुन्हा एकदा यश प्राप्त झाले.

हातमाग हा साधारण नाही ही चांगली कला आहे त्यासाठी गणित आणि संयमाची गरज आहे. एखाद्या अभियंतासारखे हे काम आहे. असे उद्गार शाळेच्या संचालिका सौ.रेखा बांदल यांनी यावेळी काढले.

या कार्यक्रमाचे नियोजन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.स्वाती कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षिका रश्मी पाथरकर, ऋचा हल्लूर, इंदू पाटील, कल्याणी शेळके आणि रश्मी बेलोकर यांनी केले. अदिती फडाळे आणि सूरज साठे हे शिक्षक मुलांसोबत उपस्थित होते.