पाषाण :
पाषाण परिसरातील नागरिकांच्या सुविधांसाठी आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. आज पाषाण येथील बालवाडी शाळेजवळील गल्ली क्रमांक ४ व ५ येथे ड्रेनेज लाईन टाकण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. हे काम क्षेत्रीय कार्यालय औंध-बाणेर यांच्या सहकार्याने आणि माजी नगरसेवक प्रमोद निम्हण यांच्या विशेष प्रयत्नातून हाती घेण्यात आले आहे.
या कामामुळे परिसरातील नागरिकांना बराच काळ भेडसावत असलेल्या ड्रेनेज समस्यांपासून दिलासा मिळणार आहे. शुभारंभ प्रसंगी माजी नगरसेवक प्रमोद निम्हण यांनी नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या तसेच त्यावर तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.
“प्रभागातील नागरिकांच्या अडचणी सोडवणे आणि विकासकामे गतीमान करणे हा माझा कायमस्वरूपी प्रयत्न राहणार आहे. जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहीन,” असे माजी नगरसेवक प्रमोद निम्हण यांनी सांगितले.
या उपक्रमामुळे पाषाण परिसरातील नागरिकांना स्वच्छता आणि आरोग्याच्या दृष्टीने मोठा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी