बाणेर :
बाणेर-बालेवाडी परिसराच्या स्वच्छतेसाठी माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेला “मिशन निर्मल” हा उपक्रम दिवसेंदिवस अधिक जोमाने पुढे जात आहे. सलग १७ वा व १८ वा दिवस साजरा करताना या मोहिमेला नागरिकांचा, स्वयंसेवकांचा आणि स्थानिक रहिवाशांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
🚩 दिवस १७ वा — बालेवाडी येथील अष्टविनायक चौक ते हायवे सर्विस रस्ता पर्यंत स्वच्छतेचा संकल्प
📍 अष्टविनायक चौक, विस्डम पार्क, 7 ॲव्हेन्यु, वाटीका, ट्रुस्पेस, ओरवी, कुल होम्स तसेच अष्टविनायक चौक ते हायवे सर्विस रस्ता या परिसरात अमोल बालवडकर फाउंडेशनच्या वतीने आज स्वच्छता मोहिम राबविण्यात आली.
या मोहिमेत नागरिक आणि स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत परिसर अधिक स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी करण्याचा निर्धार पुन्हा एकदा दृढ केला.
रस्त्यावरील कचरा संकलन, प्लास्टिक संकलन, रस्त्यांच्या कडेला असलेली झुडपे काढणे, तसेच सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखण्याबाबत जनजागृती करण्यात आली.
🚩 दिवस १८ वा — “आपलं बाणेर, स्वच्छ बाणेर” संकल्पनेला मिळाले नवे बळ
📍 बाणेर – वेलवर्थ पॅराडाईज, व्यंकटेश मिरॅबल, धनकुडे वस्ती, पॅनकार्ड क्लब रोड, सुप्रीम एस्टिया, प्राईड वॅलेन्शिया आणि सिल्वर मुन या परिसरात “मिशन निर्मल” चा १८वा दिवस उत्साहात पार पडला.
या दिवशी नागरिक आणि स्वयंसेवकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत स्वच्छता उपक्रमात योगदान दिले. विशेष म्हणजे, परिसरातील स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी एक अभिनव उपक्रम राबविण्यात आला.
ज्या व्यक्ती किंवा दुकानदारांच्या समोर अस्वच्छता आढळली, त्यांचा पुष्पहार व श्रीफळ देऊन उपहासात्मक सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून भविष्यात परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन करण्यात आले.
या अभिनव संकल्पनेमुळे नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत सकारात्मक जागरूकता वाढली असून “आपलं बाणेर, स्वच्छ बाणेर” या संकल्पनेला नवे बळ मिळाले आहे.
🌿 अमोल बालवडकर यांचा संदेश
“स्वच्छता ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नाही, ती प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. ‘मिशन निर्मल’ हा उपक्रम म्हणजे नागरिकांनी स्वच्छतेबाबत जबाबदारीची भावना मनात बाळगावी, याच उद्देशाने सुरू केला आहे,” असे माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी सांगितले.
त्यांच्या पुढाकारामुळे आज बाणेर-बालेवाडी परिसरातील अनेक भाग स्वच्छ आणि आकर्षक बनले आहेत.



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी